Tarun Bharat

ऑटो क्षेत्राला पीएलआय स्कीमचा मिळणार लाभ

42 हजार कोटीहून अधिक गुंतवणूक -37 लाख जणांना मिळालाय रोजगार ःउत्पादनात अडचणी शक्य

वृत्तसंस्था/ मुंबई

पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी ऑटो क्षेत्राला पीएलआय स्कीम अंतर्गत सुमारे 42,500 कोटी रुपये गुंतवणुकीच्या माध्यमातून पुरविले जाणार आहेत. या पीएलआय योजनेंतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन मिळणार असून 2.3 लाख कोटी इतकी उत्पादन क्षमता साध्य केली जाणार आहे.

या योजनेमुळे येणाऱया काळामध्ये साधारण साडेसात लाख जणांना नोकरीची संधी प्राप्त होणार असल्याचे सरकारी सूत्रांकडून सांगितले गेले आहे. पीएलआय योजनेचा लाभ हा ऑटोमोबाईल उद्योग व ऑटोमोबाईलशी निगडीत सुटय़ा भागांची निर्मिती करणाऱया कंपन्यांना उठविता येणार आहे. सदरच्या योजनेला केंद्र सरकारने काही दिवसापूर्वीच हिरवा कंदील दाखविला असल्याने या क्षेत्रातील कंपन्यांनी याबद्दल सरकारचे अभिनंदनही केले आहे. या उद्योगामध्ये 42,500 कोटीची नव्याने गुंतवणूक होणार असल्याने उत्पादन क्षमता वाढवता येणार आहे.

कोणाला होणार फायदा

इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी संदर्भातील उत्पादन, हैड्रोजन इंधनावरील वाहनांच्या उत्पादनासाठीही या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. दुचाकी, तीनचाकी, प्रवासी वाहने, व्यावसायिक वाहने आणि ट्रक्टर्स निर्मिती करणाऱया कंपन्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.

नोकरी देण्यात क्षेत्राचा वाटा

सध्याला या घडीला या क्षेत्रामध्ये 37 लाखाहून अधिक जण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे नोकरी बजावत असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या काळात या क्षेत्राला जबर फटका बसून अनेकांना नोकरी गमवावी लागली होती. जुलैनंतर ऑटो क्षेत्रातल्या कंपन्यांची निर्मिती प्रक्रिया पूर्वपदावर आल्याने कर्मचारी पुन्हा रुजू झाले.

चिपची अडचण

तर दुसरीकडे चिपच्या टंचाईमुळे वाहन कंपन्यांना नियोजित उत्पादन क्षमता प्राप्त करणे अडचणीचे गेले होते. सध्याही हीच परिस्थिती असल्याने येत्या उत्सवी काळामध्ये अपेक्षीत उत्पादन क्षमता साध्य करणे काहीसे अडचणीचे जाणार आहे.

Related Stories

इलेक्ट्रिक वाहनांच्या 11 व्या एक्स्पो प्रदर्शनाचा प्रारंभ

Patil_p

शेअर बाजारात आठवडय़ाचा प्रारंभ तेजीसोबत

Patil_p

सुर्योदय स्मॉल फायनान्स बँकेचा आयपीओ 17 मार्च रोजी

Patil_p

ड्रुम टेक्नॉलॉजीचा येणार आयपीओ

Patil_p

जीएमआर एअरपोर्टस् 3 हजार कोटी जमवणार

Patil_p

युनियन बँकेकडून व्याजदर कपात

Patil_p