Tarun Bharat

ऑटो डीलर्सची 300 शोरुम्स बंद

Advertisements

मदतीसाठी मारुती, टाटा मोटर्ससह होंडा मोटार मैदानात

वृत्तसंस्था/ मुंबई 

मागील काही दिवसांपासून वाहन क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात अडचणीचा सामना करत असल्याचे पहावयास मिळाले आहे. याचा अप्रत्यक्षपणे प्रभाव वाहनांच्या डिलर्सच्या शोरुमवर पडल्याचे दिसून आले. यांना सावरण्यासाठी मारुती सुझुकी, टाटा मोटर्स आणि होंडा मोटारसायलक ऍण्ड स्कूटर इंडिया या सारख्या कंपन्या ऑटो डीलर्सला वाचविण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत.

सदर कंपन्यांना आर्थिक सहाय्यतेसोबत अन्य संकट निर्माण झाली असल्याने त्याना पार करुन यातून येत्या काळात मार्ग काढण्यावर भर दिला जाणार असल्याचे म्हटले आहे. आतापर्यत 300 ऑटो डीलर्सनी आपली दुकाने बंद केली आहेत.

मार्च महिन्यानंतर एप्रिल महिन्यात वाहनांची किरकोळ विक्री शुन्य झाली आहे. यामुळे डीलर्स हे तेव्हापासून वाढत जाणाऱया लॉकडाऊमुळे आणखीन अडचणीत सापडत गेल्याचे दिसून आले आहे. यामुळे सदर विक्रीचे मूल्य 18 टक्क्मयांनी घसरुन 2.15 कोटीच्या घरात गेले आहे.याचाच प्रभाव ऑटो डीलर्सवर राहिल्याने वित्त वर्ष 2020 च्या दरम्यान 300 डीलर्सनी कायमस्वरुपी आपली शोरुम बंद केल्याचे पहावयास मिळाले आहे.

ऑटोमेटिव्ह कंपन्यांनी सांभाळली स्थिती

या डीलर्ससाठी कोणत्याही मदत देण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. परंतु ऑटोमेटीक्ह कंपन्यांची सध्याची स्थितीबाबत माहिती होती. यामध्ये  मागील काही महिन्यापासून कर्ज, कर्जाचा कालावधी, उच्च दर्जा, व्याजदर, सवलत , बँका आणि वित्तीय संस्थानकडून इन्वेंट्री कर्ज मिळवण्यासाठी मदत करण्यात आली आहे.

Related Stories

एसबीआय जनरल इन्शुरन्सकडून शगुन गिफ्ट इन पॉलिसी सादर

Patil_p

विक्रीच्या दबावात सेन्सेक्स घसरणीत

Patil_p

टीसीएस नव्या व्यवहाराच्या तयारीत

Patil_p

55 दिवसांनंतर 4.5 कोटी दुकानांनी शटर उघडले

Patil_p

सामाजिक सुरक्षा योजना

Omkar B

जूनपर्यंत नोंदणीकृत कंपन्यांची संख्या 20.14 लाखाच्या घरात

Patil_p
error: Content is protected !!