Tarun Bharat

ऑडीची क्यू 7 फेसलिफ्ट लाँच

Advertisements

2 मॉडेलमध्ये उपलब्ध होणार : प्रारंभीची किमत 79.99 लाख रुपये

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

ऑडीने क्यू 7 एसयूव्हीची फेसलिफ्ट (सुधारीत) आवृत्ती सादर केली आहे. अपडेटेड क्यू 7 च्या बेस प्रीमियम प्लस मॉडेलची सुरुवातीची किमत 79.99 लाख रुपयाने सुरुवात होते, तसेच टेक्नॉलॉजी मॉडेलची किमत 88.33 लाख रुपये आहे. ऑडी क्यू7 जवळपास दोन वर्षानंतर पुन्हा बाजारात आली आहे.

यामध्ये एप्रिल 2020 मध्ये बीएसई इंजिन असल्यामुळे उत्पादन बंद केले होते. फेसलिफ्टेड ऑडी क्यू7 या वर्जनच्या इंटिरीयरमध्ये बदल करण्यात आला आहे.

फिचर्स ः फेसलिफ्टेड क्यू7 च्या अंतर्गत आणि जादा मेकओव्हर मिळत आहे. प्री फेसलिफ्ट मॉडेलमध्ये सिंगल, फ्री स्टँडिंग स्क्रीन राहणार असून ऑडीत नवी ट्विन टचस्क्रीन एमएमआय इन्फोटेनमेन्ट सिस्टम असणार आहे. ऑडी क्यू 8 च्या प्रमाणे आहे. डॅशबोर्डमध्ये आता 10.1 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळत आहे.

स्टॅण्डर्डच्या पातळीवर क्यू7 मध्ये पॅनोरमिक सनरुफ, फोर झोन क्लायमेट कंट्रोल, ऍडजस्टेबलर एम्बियंट लाईटिंग, पावर्ड फ्रन्ट सीट्स आणि अँड्रॉईड ऑटो आणि ऍपल कार प्ले मिळणार आहे.

इंजिन गिअरबॉक्स

  • नवीन 340 एचपी, 500 एनएम, 3.0 लिटर टर्बोचार्ज्ड व्ही 6 पेट्रोल इंजिन
  • 8 स्पीड ऑटोमेटिक गिअरबॉक्स
  • प्री फेसलिफ्ट मॉडेल 249एचपी, 3.0 लिटर व्ही 6 डिझेल इंजिन

Related Stories

टेस्लाची लाँचिंग अगोदरच डिलिव्हरी

Amit Kulkarni

बीएमडब्ल्यूचा 1 लाखाचा टप्पा पार

Patil_p

टीव्हीएसकडून एनटॉर्कच्या 1 लाख गाडय़ा निर्यात

Patil_p

भारतातून होणाऱया कार निर्यातीत घट

Patil_p

हिरोची स्कूटर काही मिनिटात होणार चार्ज

Amit Kulkarni

‘टेस्ला’ वर्षअखेरीस 7 इलेक्ट्रीक कार्स भारतात आणणार

Patil_p
error: Content is protected !!