Tarun Bharat

ऑनलाइन वाहन विक्रीत वाढ

Advertisements

मुंबई

 कोरोना महामारीच्या काळात किराणासह इतर वस्तूंच्या ऑनलाइन खरेदीला  जास्त पसंती दर्शवली गेली असल्याचे आपण सारे जाणतोच. तशी ती वाहन खरेदीच्या बाबतीतही दिसली आहे. या दरम्यानच्या काळामध्ये ऑनलाइन वाहन विक्रीत तब्बल तीनशे टक्के इतकी वाढ झाली आहे. डुम या ऑटो क्षेत्रातील संस्थेने आपल्या वार्षिक अहवालात वरील माहिती दिली आहे. नव्या वाहनांऐवजी जुन्या वाहनांना मोठय़ा प्रमाणात ऑनलाइन पद्धतीने मागणी नोंदवली गेली असल्याचे संस्थेने अहवालात म्हटले आहे. वाहन रंगांच्या बाबतीत विचार करता व्हाईट व सिल्वर या दोन रंगातील कार्सना अधिक पसंती खरेदीदारांनी दर्शवली होती. या दोन रंगातील कार्सच्या मागणीमध्ये 50 टक्के इतकी वाढ दिसली आहे. यातही डिझेल कार्सच्या मागणीत वाढ जास्त जाणवली आहे. 2020 पर्यंत या कार्सची मागणी 65 टक्क्यांपर्यंत वाढू शकते, असेही संस्थेने अहवालात म्हटले आहे.

Related Stories

टाटा स्टील भारतीय पोलाद संघातून बाहेर

Patil_p

बँक ऑफ इंडियाचा नफा 90 टक्क्यांनी वधारला

Patil_p

समुद्री खाद्य निर्यातीचे 1 लाख कोटीचे ध्येय

Patil_p

विमानात बसूनच टॅक्सी बुक करा

Patil_p

रिलायन्स रिटेलची खेळणी उद्योगावर नजर

Patil_p

हॉनरचा गेमिंग लॅपटॉप लवकरच बाजारात

Patil_p
error: Content is protected !!