Tarun Bharat

ऑनलाईनद्वारे व्यवसाय परवाना नूतनीकरण सोयीचे

कमी कागदपत्रात घरबसल्या नूतनीकरण करण्याचे आवाहन

प्रतिनिधी /बेळगाव

महापालिका कार्यक्षेत्रामध्ये व्यवसाय करण्यासाठी व्यवसाय परवाना घेणे बंधनकारक आहे. पण संपूर्ण शहरात केवळ 9830 व्यावसायिकांनी आतापर्यंत व्यवसाय परवाना नेंदणी केला आहे. व्यवसाय परवाना नूतनीकरण करून घेण्याकडे देखील व्यावसायिकांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे कमी कागदपत्रे आणि घरबसल्या व्यवसाय परवाने नूतनीकरण करण्याची सुविधा महापालिका प्रशासनाने उपलब्ध केली आहे. ऑनलाईन व्यवसाय परवाने नूतनीकरण करण्याचे आवाहन महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी केले आहे.

शहरातील प्रत्येक रस्त्यावर व्यावसायिक व्यापारी संकुले आणि गाळे आहेत. यामुळे व्यावसायिकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. मात्र यापैकी काही मोजक्मयाच व्यावसायिकांनी महापालिकेकडून व्यवसाय परवाना घेतला असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडूक उपलब्ध झाली आहे. शहरात विनापरवाना व्यवसाय सुरू असल्याने पाहणी करून विनापरवाना व्यवसाय करणाऱयांचा शोध घेण्याची मागणी महापालिकेत वारंवार केली जाते. तरेदेखील व्यवसाय परवाने घेण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. तसेच परवाने नूतनीकरण करण्याकडे व्यावसायिकांनी पाठ फिरविली आहे.

व्यावसायिकांना सोयीस्कररित्या व्यवसाय परवाने उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने ऑनलाईन व्यवसाय परवाना देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पण याचा वापर व्यावसायिक करीत नाहीत. ऑनलाईन प्रणालीद्वारे व्यवसाय परवान्याचे नूतनीकरण करणे खुपच सोयीस्कर आहे. ऑनलाईन व्यवसाय परवाने देण्याची  सुविधा उपलब्ध करून चार वर्षे झाली. त्यामुळे व्यावसायिकांना ऑनलाईनद्वारे अर्ज करावा लागतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नागरिकांकडून अद्यापही म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाही. बहुतांश व्यावसायिक अद्यापही महापालिकेच्या आरोग्य विभागात लेखी स्वरुपातील अर्ज करतात. अर्ज ऑनलाईन अपडेट करण्याचे काम महापालिकेच्या तांत्रिक विभागाच्यावतीने करण्यात येते. यामुळे व्यवसाय परवाना घेण्याचे आणि देण्याचे गांभीर्य महापालिका आणि व्यावसायिकांनादेखील नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कमी कागदपत्रात व घरबसल्या व्यवसाय परवाने देण्याची सुविधा महापालिकेने केली असून केवळ घरपट्टी पावती आणि जुन्या व्यवसाय परवान्याच्या आधारे नूतनीकरण करता येवू शकते. केवळ खाद्यपदार्थ विक्री व्यवसायासंबधित व्यवसाय परवान्याकरिता विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. त्यामुळे हॉटेल, खानावळ, रेस्टॉरंट, स्विट मार्ट, बेकरी, मिनरल वॉटर आणि खाद्यपदार्थ पॅकेजिंग युनिटच्या व्यवसाय परवान्याकरिता कागदपत्राची पूर्तता केल्यानंतरच परवाने वितरित करण्यात येणार आहेत. मनपाच्या संकेतस्थळावर लॉग इन् करून केवळ चार स्टेपद्वारे ऑनलाईन व्यवसाय परवाने घेता येवू शकतात. पण अन्य व्यावसायिकांनी ऑनलाईनद्वारे अर्ज करून परवाने घेण्याचे आवाहन महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी केले आहे.

Related Stories

आरटीओचे 2022-23 चे उद्दिष्ट जाहीर

Amit Kulkarni

इंडियन कराटे क्लबला प्रथम सर्वसाधारण विजेतेपद

Amit Kulkarni

गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी द्या

Patil_p

महिला विद्यालय इंग्रजी शाळेतर्फे इनफिनिटी आंतरशालेय फेस्ट

Amit Kulkarni

रांगोळीतून साकारले ज्ञानेश्वर माऊली

Tousif Mujawar

अखेर सर्वमचा दुर्दैवी अंत

Omkar B
error: Content is protected !!