Tarun Bharat

ऑनलाईन क्लाससंबंधीही सावधगिरी बाळगा

Advertisements

चॅटबॉक्समध्ये अश्लिल संभाषण, सायबर क्राईम विभागाला माहिती द्या

प्रतिनिधी / बेळगाव

कोरोना महामारीमुळे सध्या ऑफलाईनपेक्षा ऑनलाईन क्लासना महत्त्व आले आहे. गेली दोन वर्षे केजीपासून कॉलेजपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण घेतले आहे. आता या प्रक्रियेतही बाधा आणण्याचा प्रयत्न समाजकंटकांनी सुरू केला आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सायबर क्राईम विभागाने केले आहे.

पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी गुरुवारी यासंबंधी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. शाळा, कॉलेजचे प्राचार्य व सिस्टम ऍडमीनना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून ऑनलाईन क्लासचे लिंक शेअर करताना काळजी घेण्याची गरज आहे.

चॅटबॉक्समध्ये शिक्षिका व विद्यार्थिनींबद्दल अश्लिल कॉमेंट करण्याबरोबरच काही आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड करण्याचे प्रकारही घडले आहेत. यासंबंधी सायबर क्राईम विभागाकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. ऑनलाईन क्लासच्या वेळेला आपल्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतर कोणीही लिंक वापरून क्लासला हजर होऊ नये, याची काळजी घेण्याचे आवाहनही पोलीस उपायुक्तांनी केले आहे. जर संबंध नसलेली व्यक्ती ऑनलाईन क्लासमध्ये हजर झाल्यास सिस्टीम ऍडमीननी त्वरित त्याला काढून टाकावे. खासकरून बदनामी टाळण्यासाठी विशेष खबरदारी घ्यावी. दुर्लक्ष करणाऱयांवरही कारवाईचा इशारा पोलीस उपायुक्तांनी दिला आहे. ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून विद्यार्थिनी व शिक्षिकांबद्दल आक्षेपार्ह कॉमेंट करण्याचे प्रकार वाढल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.

Related Stories

मृतदेहापासून संसर्गबाधेचा धोका नाही !

Patil_p

खानापूर शहरात 469 घरांची निर्मिती होणार

Amit Kulkarni

कपिलेश्वर मंदिरामध्ये लाकंदची आरास

Patil_p

कारवार बसस्थानकाचे काम युद्धपातळीवर

Amit Kulkarni

बेळगुंदी ग्राम पंचायत अध्यक्षपदी हेमा हदगल यांची बाजी

Amit Kulkarni

होळी शांततेत साजरी करा

Amit Kulkarni
error: Content is protected !!