Tarun Bharat

ऑनलाईन नाटक हे भविष्य आहे : अजित परब

Advertisements

मराठीतील आजचा आघाडीचा संगीत दिग्दर्शक अजित परब यांनी नेटक डॉट लाईव्हचे पहिले नेटक अर्थात इंटरनेटवरील लाईव्ह नाटक मोगराला दिलेले संगीत सध्या खूप गाजते आहे. अशाप्रकारचे हे इंटरनेटच्या माध्यमातून सादर होणारे पहिलेच नाटक असल्याने जरी मी आनंदी झालो असलो तरी त्यात अनेक अडचणी आल्या आणि त्यावर मात करत, मार्ग काढत जे काम समोर आले ते आनंद देणारे होते, असे सांगताना अजित परब यांनी हे माध्यम हे आता भविष्य आहे असेही नमूद केले आहे.

हृषिकेश जोशी यांची संकल्पना आणि दिग्दर्शन असलेले इंटरनेटवरील पहिले ऑनलाईन नाटक म्हणून सध्या ज्याची चर्चा होत आहे, त्या मोगराला अजित परब यांनी संगीत दिले आहे. हृषिकेशशिवाय स्पफहा जोशी, भार्गवी चिरमुले, गौरी देशपांडे, मयुर पालांडे आणि वंदना गुप्ते हे आघाडीचे कलाकार यात आहेत आणि विविध शहरे आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी या नाटकाचे प्रयोग झाले आहेत. नाटकातील पाचही व्यक्तिरेखांना संगीताचा वेगवेगळा प्रकार वापरत एक वेगळा प्रयोग त्यांनी या नाटकात केला आहे. त्यामुळे या नाटकाचे संगीत दिग्दर्शन अधिक मनोरंजक आणि उत्कंठावर्धक झाले, असेही त्यांनी म्हटले आहे. या नाटकासह ते टीव्ही, एकांकिका, चित्रपट अशा अनेक संगीत प्रकल्पांवर काम करत आहेत. त्याबद्दलही त्यांनी सविस्तरपणे सांगितले आहे.

मोगराला संगीत देशील का, विचारण्यासाठी माझा मित्र हृषिकेशने मला फोन केला आणि ती संकल्पना ऐकूनच मी खूष झालो. कारण असा प्रयोग आत्तापर्यंत माझ्या माहितीत तरी झालेला नाही. अशाप्रकारे ऑनलाईन प्रयोग होणार आहे आणि त्याचे संगीत दिग्दर्शन करायचे आहे, याचे अप्रूप होते. जेव्हा तालमी सुरु झाल्या तेव्हा मात्र ऑनलाईन नाटकाला संगीत देण्यामागील अडचणी, मर्यादा  लक्षात येवू लागल्या. ते कसे ऐकू येणार आहे, संगीतामधील लोज किंवा फ्रीक्वेंसी ज्या कट होतात ते ऑनलाईन कसे साधायचे याचा विचार करत त्यादृष्टीने काम करणे गरजेचे होते. यातील ज्या पाच व्यक्तिरेखा आहेत त्या सर्वांना संपूर्णत: वेगळे पाच संगीत प्रकार वापरायचे आम्ही ठरवले आणि त्यामुळे हा प्रयोग अधिकच इंटरेस्टिंग झाला आणि त्यामुळे अधिक मजा आली, असे अजित परब सांगतात.

ऑनलाईन नाटकाचा हा जो प्रकार आहे, त्याची नाटय़गफहातील नाटक, सिनेमा किंवा टेलीव्हीजनशी तुलना करता येणार नाही. हे संपूर्ण वेगळे व्यासपीठ आहे आणि त्याच दृष्टीने त्याकडे पाहिले पाहिजे. त्यात भविष्यात वेगवेगळे प्रयोग होणार आहेत. त्यामुळे मला वाटते म्युझीकली हे एक वेगळे आव्हान आहे आणि तेवढाच गमतीशीर हा अनुभव आहे. मला या नाटकाबद्दल आणि या व्यासपिठाबद्दल प्रचंड उत्कंठा आहे आणि त्यातून प्रेक्षकांसाठी मनोरंजनचे नवीन दालन खुले झाले आहे. हा प्रकार केवळ लॉकडऊनपुरता मर्यादित राहणारा नाही तर त्यानंतरही हे दालन सुरूच राहणार आहे. मला पूर्ण खात्री आहे की प्रेक्षक या ऑनलाईन नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद देतील, असे या नवीन व्यासपीठाबद्दल बोलताना परब म्हणतात.

Related Stories

सुपरस्टारला आंघोळीचा तिटकारा

Patil_p

विक्रांत मैसीसोबत चित्रपट करणार सारा

Patil_p

गायत्री दातार रिलेशनशिपमध्ये?

Patil_p

दुबईत साजरा होणार ‘गल्फ सिने फेस्ट’

Omkar B

इंदौरी इश्क’ बाबत…. समित कक्कड उत्साहित !

Patil_p

‘रहना है तेरे दिल में’चा 20 वर्षांनी सीक्वेल

Patil_p
error: Content is protected !!