Tarun Bharat

ऑनलाईन बुकिंगविना आधार कार्ड दाखवत होणार विठोबाचे दर्शन

पंढरपूर / प्रतिनिधी

विठोबाच्या दर्शनासाठी सध्या ऑनलाईन बुकींग करावे लागते. मात्र आता भाविकांना ऑनलाईन बुकिंगविना केवळ आधारकार्ड दाखवून विठोबाचे दर्शन मिळणार आहे. तसेच संक्रातीदिवशी मंदिरात रूक्मिणीमातेचा वाणवसा करण्यास बंदी असेल. पण केवळ महिलांना संध्याकाळी आधारकार्ड दाखवत कोरोनाचे नियम पाळून दर्शन देण्याचा निर्णय मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आले असल्यांची माहीती समितीचे कार्यकारी अधिकारी विठठल जोशी यांनी दिली आहे. 

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विठुमाऊलींचे दर्शन आता 20 जानेवारीपासून ऑनलाईन बुकिंगविना केवळ आधारकार्ड दाखवून भक्तांना मिळणार आहे. सद्य स्थितीत प्रतिदिन 4 हजार 800 भाविक विठोबाची दर्शन घेतात. या दर्शनाच्या भाविकांची मर्यादा 19 जानेवारीपर्यंत तब्बल आठ हजारापर्यंत वाढवण्यात आली आहे. शिवाय यंदा संक्रातीला महिलांना वाणवसा करता येणार नाही. पण संक्राती दिवशी सायंकाळी 5 वाजलेपासून 9 वाजेपर्यंत महिलांना केवळ आधारकार्ड दाखवत विठोबा अन् रूक्मिणी मातेचे दर्शन हे कोरोनाचे सर्व प्रतिबंधात्मक नियम पाळून करता येणार आहे. याबाबतचे निर्णय देखिल मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आले.

Related Stories

डॉ. दाभोलकर हत्या : भावेच्या जामिनावर 16 जानेवारीला निकाल

prashant_c

सोलापूर : माढा तालुक्यात ३६ कोरोनाबाधितांची भर

Archana Banage

‘सोलापूर विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ’

Archana Banage

तुळजाभवानीची सहाव्या माळेला शेषशाही अलंकार महापूजा

Archana Banage

सोलापूर विद्यापीठातर्फे ‘जागर पत्रकारितेचा’ माध्यम सप्ताहाचे आयोजन

Archana Banage

सोलापूर : कोविड केअर सेंटरमधून १५ कोरोनाबाधितांनी केले पलायन

Archana Banage
error: Content is protected !!