Tarun Bharat

ऑनलाईन लॉटरी केंद्रावर शाहुपुरी पोलिसांचा छापा

सातारा / प्रतिनिधी

येथील राधिका रोडवरील पंचशिल अपार्टमेंटच्या बेसमेंटमधील पश्चिमेकडील गाळा क्र. 2 मध्ये विनोद दशरथ कांबळे (रा. रविवार पेठ सातारा) हा ऑनलाईन लॉटरी जुगार चालवत असल्याची शाहुपुरी पोलिसांना माहिती मिळताच छापा टाकून त्याच्यासह आणखी एकास अटक करण्यात आली आहे. त्या दोघांच्याकडून 85 हजार 180 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी शाहुपूरी पोलीस ठाणे हद्दीतील अवैध व्यवसायावर कारवाई करण्याबाबत शाहुपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांना मार्गदर्शन करुन सूचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे सपोनि वायकर यांनी त्यांचे एक पथक तयार केले होते. दि. 10 रोजी शाहुपुरी पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल वायकर यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सातारा शहरातील राधिका रोडवरील पंचशिल अपार्टमेंटच्या बेसमेंटमधील पश्चिमेकडील गाळा क्र. 2 मध्ये विनोद दशरथ कांबळे हा त्याचा कामगार उमेश जगन्नाथ मस्के (रा. रविवार पेठ सातारा) याच्यामार्फत ऑनलाईन लॉटरी सेंटरमध्ये बेकायदेशीरपणे ऑनलाईन आकडे लावुन लोकांच्याकडुन पैसे स्वीकारुन ऑनलाईन लॉटरी जुगार चालवित आहे. तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करुन व्हिडीओ गेम चालवित आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाली. ही बातमी मिळाल्यानंतर सपोनि वायकर यांनी त्याबाबत सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांना माहिती देवुन त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे कारवाईसाठी शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक तयार केले. सपोनि वायकर यांनी त्यांच्या पथकाला आवश्यक सूचना देवुन त्यांच्यासह बातमीचे ठिकाणी जावुन छापा टाकला असता त्याठिकाणी त्यांना मस्के हा बेकायदेशीरपणे ऑनलाईन लॉटरी नावचा जुगार चालवित असल्याचे तसेच जिल्हाधिकाऱयाच्या आदेशाचा भंग करुन विनापरवाना व्हिडीओ गेम चालवित असतांना मिळुन आला. तेव्हा त्याच्याकडे विचारपुस केली असता त्याने लॉटरी सेंटर व व्हिडीओ गेम हे त्याचा मालक विनोद कांबळे याच्या सांगण्यावरुन रोजंदारीवर चालवित असल्याचे सांगितले.

शाहुपुरी पोलीसांनी छापा टाकुन ठिकाणावरुन रोख रक्कम, कॉम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर मशिन, मोबाईल हॅन्डसेट, व्हिडीओ गेम मशिन असा एकुण 85 हजार 180 रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला असुन पो. नाईक अमीत माने यांनी फिर्यादी दाखल केली आहे. लॉटरी सेंटर चालकाविरुद्ध व मालकाविरुद्ध शाहुपुरी पोलीस ठाण्यास करण्यात आला आहे. शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने बेकायदेशीरपणे चालणारे ऑनलाईन लॉटरी जुगार सेंटर व विनापरवाना व्हिडीओ गेम चालविणाऱयावर धाड टाकुन लॉटरी सेंटर चालकास अटक केली आहे. ही कारवाई सहा. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक विशाल वायकर, संदिप शितोळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल हसन तडवी, पो. ना. लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, पो. कॉ. ओंकार यादव, मोहन पवार, पंकज मोहिते, तुषार पांढरपट्टे यांनी केली आहे.

Related Stories

कोल्हापूर : सायंकाळपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय

Archana Banage

राजवाडा साफसफाईचे राजमाता कल्पनाराजेचे आदेश

Patil_p

यशवंतराव चव्हाण यांचा वारसा चालविणार

Patil_p

सांगली : मराठा आरक्षणासाठी डिजिटल आंदोलनास सुरुवात

Archana Banage

सातारा जिल्ह्यात पदवीधरसाठी 58.27 तर शिक्षकसाठी 81.96 टक्के मतदान

Archana Banage

सातारा सैनिक स्कूल सीबीएससी दहावीचा निकाल १०० टक्के ‌

Archana Banage