Tarun Bharat

ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत गगनबावड्याची वैदेही पाध्ये प्रथम

म्हासुर्ली / वार्ताहर

सध्या जग व भारत देश एका अनपेक्षित अशा कोरोना व्हायरस रोगाशी लढत असून सर्वांवर लॉकडाऊनची परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे कोणालाही घराबाहेर पडता येत नसल्याने घरी असताना सर्वांचे मनोधैर्य वाढावे या उद्देशाने नवा पर्व, युवा सर्व’ या फेसबुक पेजच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या ‘ऑनलाईन व्हायरल चित्रकला व वक्तृत्व स्पर्धे’त कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील कु. वैदेही श्रीकृष्ण पाध्ये हिने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकाविला. 

             वैदेही पाध्ये हिने भाषणासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा’ हा विषय निवडला होता. या ऑनलाईन स्पर्धेत महाराष्ट्रभरातून स्पर्धक सहभागी झाले होते. यासर्वांवर मात करत वैदेहीने प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
              ऑनलाईन घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत व चित्रकला स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून तब्बल ५०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. यातून लाईक, कमेंट, व्हिज आणि शेअर याच्या आधारे गुणांकन देऊन विजेते घोषित करण्यात आले. भाषण स्पर्धेत वैदेही पाध्ये हिने आपल्या भाषणाला १०६२ लाईक, ७५५ कमेंट, ५६२ शेअर, आणि १३,७०० व्हिजच्या आधारे एकूण ३७४९ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तर दुसरा क्रमांक शबाना मोमिन, तिसरा क्रमांक अजय अंधारे, चौथा क्रमांक संभाजी पाटील आणि पाचवा क्रमांक माधवी देशमुख यांना मिळाला. स्पर्धेचा सर्व निकाल लाईव्ह व्हिडीओच्या माध्यमातून आयोजक प्रा. तुषार वाघमारे यांनी घोषित केला.
            सध्या  जग व भारत देश एका अनपेक्षित अशा कोरोना व्हायरस रोगाशी लढत असून सर्वांवर लॉकडाऊनची परिस्थिती ओढावली आहे. त्यामुळे कोणालाही घराबाहेर पडता येत नसल्याने घरी असताना सर्वांचे मनोधैर्य वाढावे या उद्देशाने या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Related Stories

गांधी जयंतीदिनी केबल ऑपरेटरांचा संप

Archana Banage

वाढीव वीजबिला संदर्भात मनसेची पन्हाळ्यात निदर्शने

Archana Banage

Monsoon Update : राज्याच्या विविध भागात पावसाची दमदार एंट्री ,तर वीज कोसळून दोन मुलींचा मृत्यू

Abhijeet Khandekar

मालमत्तेच्या वादातून सावत्र आईचा खून, मुलास जन्मठेप

Abhijeet Khandekar

व्हीनस कॉर्नरवरील राजाराम महाराजांचा पुतळाही मुळ ब्राँझ स्वरुपात

Abhijeet Khandekar

चाकूचा धाक दाखवून एक तोळा सोन्याचा दागिना लंपास

Archana Banage