Tarun Bharat

ऑनलाईन वर्ग सुरू झालेल्या परदेशी विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द होणार

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :

अमेरिकेत बहुसंख्य शाळा, महाविद्यालयांचे ऑनलाईन वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे परदेशी विद्यार्थ्यांना सध्या अमेरिकेत राहण्याची गरज नाही. ज्यांचे ऑनलाईन वर्ग सुरू झाले आहेत, त्या विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिस्क ऑपरेशनचा भाग म्हणून अमेरिकेने या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या देशात परत पाठविण्याची तयारी केली आहे. भारतीय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात या निर्णयाचा फटका बसणार आहे. अमेरिकेत, परदेशी विद्यार्थी मोठ्या संख्येने विद्यापीठांमध्ये ट्रेनिंग प्रोग्राम आणि नॉन अकॅडमिक वोकेशनल प्रोग्राम शिकत आहेत.

ट्रम्प प्रशासनाने सर्व विद्यापीठ आणि कॉलेजना सर्व कोर्सेस लवकरात लवकर ऑनलाईन सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने लवकरच काही अभ्यासक्रम ‘फक्त ऑनलाईन’ स्वरूपात रुपांतरित केले जाऊ शकतात, असेही ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे.

Related Stories

जगातील सर्वात अवघड परीक्षा

Patil_p

अमेरिकेच्या हल्ल्यात कासिम सोलेमान ठार

Patil_p

झारखंडमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Tousif Mujawar

इटलीत कोरोनाबळींची संख्या 70 हजारांवर

datta jadhav

ब्रिटिश राजपुत्राचा उपचाराचे बिल भरण्यास राजाचा नकार

Patil_p

पाकच्या तुरूंगातील भारतीयांची लवकरच सुटका

datta jadhav