Tarun Bharat

ऑनलाईन शिक्षणासमवेत संस्कारांचेही हस्तांतरण

सध्या कोरोनाच्या महाउद्रेकामुळे शाळा बंद असून विद्यार्थ्यांना घरातच अभ्यास करावा लागत आहे. अनेक शाळांनी तसेच खासगी संस्थांनी इयत्ता पहिलीपासून दहावीपर्यंतच्या ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था इंटरनेटच्या माध्यमातून केली आहे. शाळा बंद असली तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये हा हेतू या उपक्रमामागे आहे. लक्षावधी विद्यार्थी अशा प्रकारचे शिक्षण घेत आहेत.

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे अनेक शाळांनी एकत्र येत विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था केली आहे. तथापि केवळ शिक्षण न देता विद्यार्थ्यांवर योग्य ते संस्कार व्हावेत आणि कोरोनासंबंधी त्यांचे प्रबोधन व्हावे याचीही व्यवस्था शिक्षणाबरोबरच ऑनलाईन करण्यात आली आहे. कारोना काळात विद्यार्थ्यांनी कोणता पौष्टिक आहार घ्यावा, आपले हात कशा प्रकारचे स्वच्छ करावेत, पौष्टिक अहार घराच्या घरी कसा बनवावा, टॉमेटो कांदा, व इतर कशा चिराव्यात इत्यादी माहिती विद्यार्थ्यांना या उपक्रमांतर्गत दिली जात आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास, हस्त व्यवसाय, तसेच विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षणही या ऑनलाईन माध्यमातून दिले जात आहे. शाळेत ज्या प्रकारचे वातावरण असते तसे घरातही निर्माण करण्याचा हा स्तुत्य प्रयत्न असून त्याचे कौतुक होत आहे.

Related Stories

“… तर योगी आदित्यनाथ पंतप्रधान पदाचे दावेदार”

Archana Banage

जम्मू काश्मीरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 15 हजारांच्या उंबरठ्यावर

Tousif Mujawar

मोदींच्या हस्ते ‘समृद्धी’चं लोकार्पण; 75 हजार कोटींच्या प्रकल्पाची पायाभरणी

datta jadhav

अफगाण शरणार्थींना परत धाडणार नाही

Patil_p

4.4 रिश्टर स्केलचा गुजरातमध्ये भूकंप

Patil_p

पंजाब : कोरोना बाधितांची संख्या 1 लाख 56 हजार 839 वर

Tousif Mujawar