Tarun Bharat

ऑनलाईन सेफ्टी : शाळा व शिक्षक-विद्यार्थी

Advertisements

कोविड-19 च्या महामारीमुळे जगभरातील शैक्षणिक क्षेत्र प्रभावित झाले. अजूनही त्याची भीती गेली नाही. त्यात आणखीन एक नवीन व्हायरस येऊ घातला आहे. अगदी प्राथमिक शाळांपासून ते पदवी देणाऱया संस्थांपर्यंतच्या शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि त्यांच्या कॅम्पसमधून या साथीच्या रोगाचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी त्यांचे कॅम्पस बंद केले. तथापि, तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रातील अलीकडील प्रगतीमुळे, शिक्षण इंटरनेटद्वारे केले जाऊ लागले. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील परस्परसंवादासाठी वर्गखोल्या जाऊन व्हर्च्युअल खोल्या निर्माण झाल्या. आज जरी शाळा महाविद्यालय सुरु झाल्या तरी ऑनलाईन शिक्षण पद्धती ही भविष्यात चालू राहणारच आहे. 

ऑनलाइन शिकवताना, शिक्षकांना धडय़ाच्या नोट्स सोशल मीडिया किंवा मेसेजींग ऍप्सद्वारे विद्यार्थ्यांना पाठवितात तसेच विद्यार्थ्यांना व्हर्च्युअली वर्गामध्ये जोडून घेतले जाते. हे सर्व करत असताना या ऍप्समध्ये काही सुरक्षेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. ज्याचे रुपांतर सायबर गुन्हय़ामध्ये घडू शकते. जरी आज शाळा सुरु झाल्यातरी शिक्षकांचा डेटा जो त्यांनी व्हर्च्युअल वर्गासाठी तयार केला होता त्याची सिक्मयुरिटी जपणे आवश्यक आहे.

कोणत्या समस्या येतात

मग अशा कोणत्या समस्या आहेत ज्या शिक्षकांना येऊ शकतात. ऑनलाईन फसवणूक करणे म्हणजे ऍप्स विकत घेणे, रजिस्ट्रेशन करण्यासाठी पैशाची मागणी करणे (लिंक्स पाठवून), बौद्धिक मालमत्तेची (इंटलेक्मयुअल प्रॉपर्टी) चोरी करणे, ओळख चोरणे किंवा गोपनीयतेचे उल्लंघन करणे यासारख्या बेकायदेशीर गोष्टी शिक्षकांच्या बाबतीत घडू शकतात. तसेच शिक्षण संस्थांकडे डेटा सर्व्हर असतात त्यावरही काही रॅनसमवेअरचे हल्ले होतात आणि झालेही आहेत. त्यामुळे शाळेची स्वतःची ई-सेफ्टी किंवा सायबर सिक्मयुरिटी पॉलीसी असणे गरजेचे आहे.

सायबर क्रिमिनल्स हे युझरच्या सॉफ्टवेअर, मोबाइल ऍप्लीकेशन्स (ऍप्स) आणि ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी वापरल्या जाणाऱया वेब-आधारित ऍप्समधील कमकुवतपणाचा फायदा घेतात.

शाळेच्या माहिती प्रणालीवर (इन्फोर्मेशन सिस्टीम) अनधिकृत प्रवेश करणे हे त्यांच्यासाठी नवीन नाही. कोणत्याही लॅपटॉप, स्मार्टफोनमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करणे किंवा तिचा गैरवापर करण्याच्या हेतूने किंवा त्यात असलेल्या माहितीमध्ये फेरफार करण्याच्या हेतूने शिरकाव केला जातो. शिक्षकांच्या किंवा ऍडमिनच्या सिस्टीममध्ये प्रवेश मिळवणे व अभ्यासक्रमाशी संबंधित माहितीचे नुकसान किंवा गैरवापर करणे हा हेतू समोर ठेवून प्रवेश केला जातो.

बेकायदेशीर मार्गाने डेटा मिळवणे आणि शिक्षक, संस्था यांच्या संमतीशिवाय तो इतरांना प्रसारीत करणे असे उद्योग हे क्रिमिनल्स करत असतात. उदा., विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती किंवा अभ्यासक्रमाचे ग्रेड मिळविणे व ते सोशल मीडियावर प्रसारीत करणे.

 शिक्षकांची किंवा विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती मिळवणे आणि तोतयागिरी करुन आपण शिक्षक आहोत किंवा क्लासमध्ये विद्यार्थी आहोत असे भासविणे व ऑनलाइन वर्गात त्यांची इमेज खराब करणे किंवा अश्लील व्हिडीओ फोटो सादर करणे, विद्यार्थ्यांचे ईमेल/पासवर्ड वापरणे असले उद्योग केले जातात.

माहिती प्रणाली किंवा डेटामध्ये हस्तक्षेप करणे. कार्यक्षमतेचा किंवा त्याद्वारे वापरत असलेल्या सेवांचा वापर डेटा नष्ट करण्याच्या उद्देशाने सिस्टममध्ये प्रवेश करणे. बऱयाचदा असे अनधिकृतरित्या प्रवेश करुन लाइव्ह व्याख्यानामध्ये व्यत्यय आणण्यासाठी प्रशिक्षकाच्या सिस्टमवर हल्ला करणे हा उद्देश असू शकतो. स्पॅमिंग द्वारे मोठय़ा प्रमाणात अश्लील, अयोग्य, बेकायदेशीर संदेशाद्वारे व्हायरस किंवा मालवेअर पाठवायचा जेणे करुन ऑनलाईन पाठामध्ये गोंधळ निर्माण होईल.

काळजी कशी घ्याल

सर्व मीटिंग सदस्यांना तुम्ही ओळखता याची तपासणी करा, खात्री करा. सॉफ्टवेअर अपडेट आहेना ते पॅच केले आहे याची खात्री करा.

वर्गादरम्यान सुरक्षित प्रणाली आणि नेटवर्कचा वापर योग्य पध्दतीने होतो आहे याची खात्री करा. जर शक्मय असेल तर वर्गादरम्यान सहभागींच्या कॅमेरा आणि मायक्रोफोनची कार्यक्षमता बंद करा. शक्मय असेल तेथे स्वतःबद्दल आणि इतर सहभागींबद्दल वैयक्तिक माहिती वापरणे टाळा. प्रत्येकवेळी नवीन लिंक वापरा तसेच ती लिंक त्याच वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसोबतच शेअर झाली आहे याची खात्री करा. शाळेच्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतर कोणालाही लिंक शेअर होत नाही ना याची पडताळणी करा. मीटिंग संपल्यानंतर पुन्हा सामील होणे मीटिंग लिंक रीसेट करून प्रतिबंधित केले जाऊ शकते, तसे करणे केव्हाही योग्य आहे. चॅट किंवा कमेंटमध्ये अनधिकृत व्यक्तीने शेअर केलेली कोणतीही लिंक उघडायची नाही याची कल्पना विद्यार्थ्यांना द्यावी. स्क्रीन शेअरिंगवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. नावनोंदणीनंतर तुमची माहिती एडीट करू नका. फक्त तुमचे अधिकृत नाव वापरा. फाइल शेअरिंग डीसेबल करा. त्याऐवजी, फाइल पाठवण्यासाठी ईमेलचा वापर करा. तुमचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सॉफ्टवेअर लिगल आहे ना, विपेत्याने प्रदान केलेल्या अपडेटसह पॅच केलेले असल्याची खात्री करा आणि ऑटो अपडेट चालू आहे ना हे पहा. वैयक्तिक आणि गोपनीय माहिती शेअर करू नका.

हे सर्व शिक्षक म्हणून करावयाच्या बाबी झाल्या. मात्र शाळांनीही ही सायबर सुरक्षिततेची जबाबदारी पेलली पाहिजे. ई-सुरक्षा आणि या ‘ऑनलाइन लाईफ’ला विद्यार्थ्यांनी कसे सामोरे जावे हे शाळांचे प्रमुख प्राधान्य असावे.

सायबर सिक्युरिटी पॉलिसी गरजेचीच

शाळेची ‘सायबर सिक्मयुरिटी पॉलिसी’ असणे आवश्यक आहे. या पॉलिसीमध्ये गुन्हा घडू नये म्हणून काय करावे तसेच घडला तर काय करावे याची नियमावली, रुपरेषेचा  समावेश असला पाहिजे. सोशल साईटवर मुलांच्या व खासकरुन मुलींच्या बाबतीत सायबर बुलिंग/स्टेकिंग (गुंडगिरी) होत असते. जर अशी एखादी बाब घडली व ती शिक्षकांच्या नजरेत आली (ऑनलाईन तासावेळी किंवा त्या विद्यार्थिनीने सांगितली) तर ती कशी हाताळावी याबाबत पॉलिसी ठरविणे गरजेचे आहे. 

ई-सेफ्टी पॉलिसीत समाविष्ट करायच्या गोष्टी

साधारण शाळेच्या ई-सेफ्टी पॉलिसीमध्ये काय समाविष्ट करु शकता तर, शाळेच्या ऑनलाइन सिक्मयुरिटी को-ऑर्डीनेटरचे नाव, घटना घडली तर प्रतिसादाचे स्वरुप व कार्यपध्दती, इंटरनेट, सोशल मीडिया आणि शाळेतील मोबाईल फोन वापरासंबंधीची रुपरेषा.शाळेच्या दृष्टीने शिक्षक व विद्यार्थी हे सर्वस्व आहे. या सायबर युगामध्ये शिक्षक, विद्यार्थी यांना सायबर सिक्मयुरिटी बाबत सजग राहण्यासाठी शाळेने ही जबाबदारी उचलणे व शाळेची ई-सेफ्टी पॉलिसी असणे ही काळाची गरज ठरत आहे.

               -विनायक राजाध्यक्ष

Related Stories

काथ्याकूट!

Patil_p

नंतरचे दिवस

Patil_p

हमी शेतकऱयाला द्या

Patil_p

कोकणात शिंदे गटाला बळ!

Patil_p

रम्य संध्याकाळ

Patil_p

व्यंकय्या नायडूंचे अश्रू

Amit Kulkarni
error: Content is protected !!