Tarun Bharat

ऑन लाईन अभिनय स्पर्धेत स्नेहा धडवई प्रथम

सातारच्या रंगककर्मींचा उपक्रम : लॉकडाऊनच्या काळात कलाकारांना प्रोत्साहन

प्रतिनिधी/ सातारा

साताऱयातील काही ज्येष्ठ रंगकर्मींनी एकत्र येऊन लॉकडाऊन काळातील ऍक्टिव्हिटी म्हणून एक मिनिटापर्यंतचे स्वगत (मोनोलॉग) स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत स्नेहा धडवई (प्रथम), आकाश पाटील (द्वितीय), दिपेंती चिकने (तृतीय) क्रमांक पटकावला असल्याची माहिती अभिनेते बाळकृष्ण शिंदे यांनी दिली.

  याच स्पर्धेत स्नेहा पवार (चतुर्थ), निकिता कुलकर्णी (पाचवा) क्रमांक पटकावला तर उत्तेजनार्थ विभागात मेघना होशिंग (उत्तेजनार्थ प्रथम), मंजिरी मोघे (उत्तेजनार्थ द्वितीय), निहारिका चावरे  (उत्तेजनार्थ तृतीय), जय तिताडे (उत्तेजनार्थ चतुर्थ), अभिमन्यू तांबे  (उत्तेजनार्थ पाचवा), पंकज काळे (उत्तेजनार्थ सहावा), साईशा केसकर (उत्तेजनार्थ सातवा) क्रमांक पटकावला आहे.

लॉकडाऊन काळात नेमकं काय करावं? असा प्रश्न सगळ्यांसाठीच उपस्थित होत आहे. उन्हाळ्याचे दिवस हे साधारणपणे नाटय़चळवळीचे स्पर्धेचे दिवस आणि आता हेच दिवस लॉकडाऊन मध्ये अडकल्याने रंगकर्मी मंडळी थोडीशी अस्वस्थ झाली होती. म्हणून सातारा जिह्यातील रंगकर्मींनी  लॉकडाऊन काळात घरीच राहावं आणि स्वतःच्या अभिनयावर काम करावं, या हेतूने  साताऱयातील काही ज्येष्ठ रंगकर्मींनी एकत्र येऊन ही स्पर्धा आयोजित केली होती आणि तीही ऑनलाइन.

यामध्ये म्हणजे कलाकारांनी आपला मोनोलॉग आपलं घर किंवा घराच्या परिसरात चित्रित करून तो व्हॉट्सअप वर पाठवून द्यायचा होता. त्याचबरोबर स्पर्धकाने लॉकडाऊन काळातील कोणत्याही शासकीय नियमांचं उल्लंघन केल्याचं आढळल्यास त्या स्पर्धकाला स्पर्धेतून बाद केले जाईल अशी अट ही घातली गेली होती. या स्पर्धेसाठी रहिमतपूर, वाई, सातारा, उंब्रज या भागातून एकूण त्रेपन्न कलावंतांनी आपला सहभाग नोंदविला होता.

या स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी नाटय़-चित्रपट लेखक व दिग्दर्शक नितीन दीक्षित यांनी पार पडली. तसेच  मिलिंद वाळिंबे, कल्याण राक्षे, धैर्यशील उतेकर, प्रसाद देवळेकर, जगदीश पवार, बाळकृष्ण शिंदे आणि प्रसाद नारकर या मंडळींनी ही स्पर्धा उत्तम रीतीने पार पडावी म्हणून प्रयत्न केले. सचिन मोटे, मकरंद गोसावी, राजीव मुळ्ये, चंद्रकांत कांबीरे, प्रमोद कोपर्डे, डॉ. निलेश माने, जमीर आतार, डॉ. मिलिंद सुर्वे आदी मान्यवरांनी विजेत्यांचे अभिनंदन केले

Related Stories

रवींद्रनाथ टागोरांच्या ‘त्या’ वास्तुची होणार विक्री; खरेदीसाठी ममता सकारात्मक

Archana Banage

बँक मॅनेंजरला महामार्गावर लुटले

Patil_p

Kolhapur; मसाई पठाराचा राखीव संवर्धन क्षेत्रात समावेश

Kalyani Amanagi

मलिकांच्या अडचणी वाढणार; ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

datta jadhav

कोरोनाचा कहर : महाराष्ट्रात शुक्रवारी 8333 नवे रुग्ण

Tousif Mujawar

सांगली : दिघंचीतील महिला डॉक्टरला कोरोनाची लागण

Archana Banage