Tarun Bharat

ऑपरेशन कमळ : येडियुराप्पांच्या चौकशीला संमती

प्रतिनिधी / बेंगळूर

‘ऑपरेशन कमळ’द्वारे निजद आमदारांना भाजपमध्ये आणण्यासाठी आमिष दाखविल्याच्या आरोपप्रकरणी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची चौकशी करण्यास लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने संमती दर्शविली आहे. त्यामुळे येडियुराप्पा यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.

विरोधी पक्षनेता असताना येडियुराप्पा यांनी रायचूर जिल्हय़ातील देवदूर्ग येथे गुरुमित्कलचे निजद आमदार नागनगौडा कंदकूर यांना भाजपमध्ये आणण्यासाठी आमिष दाखविल्याचा आरोप आहे. यासंबंधीची ध्वनीफितही व्हायरल झाली होती. याप्रकरणी आमदार नागनगौडा यांचे पुत्र शरणगौडा यांनी येडियुराप्पा, शिवनगौडा नायक, प्रीतमगौडा आणि एम. बी. मरमकल यांच्याविरोधात देवदुर्ग पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

एफआयआर रद्द करण्यासंबंधी येडियुराप्पांनी उच्च न्यायालयाच्या गुलबर्गा खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यांच्याविरोधातील एफआयआरला खंडपीठाने स्थगिती देत प्रकरण बेंगळूरमधील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाकडे वर्ग केले होते. बुधवारी याप्रकरणासंबंधी सुनावणी करताना न्या. जॉन मायकल कुन्हा यांनी येडियुराप्पांविरुद्ध दाखल झालेल्या एफआयआरवरील स्थगिती उठविली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. येडियुराप्पांच्या वतीने वकील अशोक हारनहळ्ळी, सी. व्ही. नागेश आणि सरकारी वकिलांनी युक्तीवाद केला. तर तक्रारदार शरणगौडा यांच्या वतीने वकील पी. रवीकुमार आणि विलासकुमार यांनी युक्तीवाद केला.

Related Stories

कर्नाटकात मागील २४ तासात १ हजार ५३१ नवीन रुग्ण, तर १९ मृत्यू

Archana Banage

हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून

Omkar B

कर्नाटकात शुक्रवारी ३,३१० नवीन संक्रमितांची नोंद

Archana Banage

बेंगळूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी रुग्ण संख्येत वाढ

Archana Banage

कर्नाटक: लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरच ऑफलाईन वर्ग: उच्च शिक्षण मंत्री

Archana Banage

कर्नाटक: राज्यात सलग तिसऱ्या दिवशी बाधितांच्या संख्येत वाढ

Archana Banage
error: Content is protected !!