Tarun Bharat

ऑपरेशन द लंडन ब्रिज लीक

Advertisements

महाराणीच्या निधनानंतरच्या तयारीची गुप्त योजना उघड

वृत्तसंस्था / लंडन

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची प्रकृती उत्तम आहे. पण राजघराण्याच्या परंपरेनुसार त्यांच्या निधनानंतर अंत्यसंस्काराच्या तयारींची गुप्त योजना उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. एका वृत्त संकेतस्थळाने यासंबंधीचे दस्तऐवज प्रसारित केले आहेत. योजनेनुसार महाराणीच्या निधनाच्या 10 मिनिटांमध्ये वॉइटहॉलचे ध्वज अर्ध्यावर आणले जातील. त्यानंतर युवराज चार्ल्स टीव्हीवर जनतेला संबोधित करतील आणि त्यानंतर ब्रिटनच्या दौऱयावर रवाना होतील. अंत्यसंस्काराचा कार्यक्रम 10 दिवस चालणार आहे.

महाराणींच्या पार्थिवाला युवराज फिलिप यांच्या शेजारी दफन करण्यात येईल. या सर्व गोष्टींचा उल्लेख ‘ऑपरेशन लंडन ब्रिज’मध्ये करण्यात आला आहे. याचबरोबर युवराज चार्ल्स यांच्या राज्याभिषेकाची गुप्त योजना (ऑपरेशन स्प्रिंग टाइड) देखील लीक झाली आहे.

चौकशी होण्याची शक्यता

लीक झालेल्या अहवालात महाराणींच्या निधनाचा दिवस म्हणजेच ‘डी डे’ची पूर्ण योजना नमूद आहे. यानुसार निधनाची माहिती त्यांचे सचिव पंतप्रधानांना देदील. योजनेचा खुलासा झाल्याने राजघराण्यात खळबळ उडाली आहे. बकिंगहॅम पॅलेसची नाराजी पाहता सरकार चौकशी करण्याचा निर्णय घेऊ शकते.

पार्थिव संसदेत ठेवले जाणार

राजघराण्यानंतर निधनाची माहिती सर्वप्रथम पंतप्रधानांना कळविण्यात येणार आहे. निधनाच्या तासाभरानंतर महाराणींना गन सॅल्युट दिला जाईल. राजघराणे प्रसारमाध्यमांद्वारे महाराणींचा अंत्यसंस्कार वेस्टमिंस्टर ऐबेमध्ये होणार असल्याची माहिती अधिकृतपणे देणार आहे. अंत्यसंस्कारापूर्वीचे 3 दिवस पार्थिव संसदेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

लंडनमध्ये गर्दी उसळणार

दस्तऐवजांमध्ये महाराणीच्या मृत्यूनंतर वाहतूक विभागाच्या योजनेचाही उल्लेख आहे. इतिहासात पहिल्यांदाच लंडनमध्ये प्रचंड गर्दी होणार असून रेल्वे आणि बसेस पूर्ण क्षमतेने धावत असतील. हॉटेल्समध्ये मोठी गर्दी असेल तर इंटरनेटचा काळ विचारात घेत सोशल मीडिया विषयक योजनाही आखण्यात आली आहे.

संकेतस्थळचे पेज ब्लॉक करणार

राजघराण्याच्या संकेतस्थळाचे पेज पूर्णपणे ब्लॉक केले जाणार आहे. सरकारचे मंत्री आणि विभागांना सोशल मीडिया संदेशांसाठी प्रथम राजनयिक तज्ञांकडून अनुमती घ्यावी लागणार आहे, जेणेकरून संवेदनशील काळात कुठल्याही प्रकारची गडबड होऊ नये.

1960 मधील योजना

निधनाच्या दिवसापासून पुढील 10 दिवसांपर्यंत काय घडणार हे या योजनेत नमूद आहे. 10 वा दिवस ‘राष्ट्रीय शोक दिन’ असेल. ‘लंडन ब्रिज इन फॉलन’ या कोडवर्डचा वापर होणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. ही योजना पहिल्यांदा 1960 मध्ये तयार करण्यात आली होती. कोरोना काळात ती अपडेट करण्यात आली आहे. 95 वर्षीय महाराणी ब्रिटिश इतिहासात सर्वाधिक काळ राज्य करणाऱया व्यक्ती ठरल्या आहेत.

Related Stories

रशियाचे कोरोनावर आणखी एक औषध

Patil_p

मध्य मेक्सिकोतील गोळीबारात 19 ठार

Patil_p

ऑस्ट्रेलियाचा प्रवास टाळा : चीन

Patil_p

हायड्रॉक्सी क्लोरोक्विनला ‘संजीवनी बूटी’ची उपमा

Patil_p

अनलॉक तरीही नवे कोरोनाबाधित घटले

Patil_p

भारताचा जवळचा मित्र रशियानं तालिबान्यांचं केलं कौतुक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!