Tarun Bharat

ऑरेंज झोनमधील सवलतीसंदर्भात उद्या बैठक

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक, चेंबर ऑफ कॉमर्ससह 10 संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार

प्रतिनिधी/कोल्हापूर

‘कोरोना’ संदर्भात जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आहे. सोमवारी 4 मेपासून लॉकडाऊनमध्ये काही सुट मिळणार आहे. राज्याच्या परिपत्रकानुसार कोणत्या उद्योगांना सुट दिली आहे, यासंदर्भात उद्या, सोमवारी, 4 रोजी सकाळी साडेअकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात चेंबर ऑफ कॉमर्ससह विविध संघटनांच्या पदाधिकाऱयांच्या बैठक होणार आहे.

कोरोना प्रतिबंधात लॉकडाऊन 17 मे पर्यत वाढला आहे. जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आहे. त्यातंर्गत कोणते व्यवसाय सुरू राहणार, कोणाला सवलत मिळणार, यासंदर्भात संभ्रमावस्था आहे. यावर चर्चा करण्यासाठी रविवारी सायंकाळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी विविध औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱयांना बैठकीसाठी बोलावले होते. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्हिडीओ कॉन्फरसिंग मुळे ही बैठक रद्द करण्यात आली. ही बैठक सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.

जिल्हाधिकाऱयांसमवेत सोमवारी होणाऱया या बैठकीला चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटय़े, कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भारत ओसवाल, कुलदीप गायकवाड, प्लायवुड असोशिएशनचे अध्यक्ष संजय पाटील, कोल्हापूर टिंबर असोशिएशनचे अध्यक्ष हरीभाई पटेल, स्टोन ट्रेडर्स असोशिएशनचे धनंजय दुग्गे, इलेक्ट्रिकल असोशिएशनचे अजित कोठारी, स्मॅक संघटनेचे अतुल पाटील, गोशिमाचे अध्यक्ष सचिन शिरगावकर, कोल्हापूर इंजिनिअरींग असोशिएशनचे अध्यक्ष अतुल आरवाडे, चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती संजय शेटय़े यांनी दिली.

Related Stories

नवीन ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ साठी जनरल मनोज नरवणे यांचं नाव आघाडीवर

Abhijeet Khandekar

सांगली जिल्ह्यात नवीन सोळा रुग्ण वाढले , पंधरा जण कोरोनामुक्त

Archana Banage

कोल्हापूर महापालिकेच्या ‘आपले बजेट’मध्ये आरोग्याची काळजी

Archana Banage

Kolhapur : पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनासाठी जिल्हा परिषद सज्ज

Abhijeet Khandekar

सदाशिवगडावर घुमला वृक्ष संवर्धनाचा नारा

Patil_p

खबरदार! पशुसंवर्धन विभागाचे आदेश वाचा , पुरात ज्यांची जनावरे वाहून जातील त्यांच्यावर कारवाई

Rahul Gadkar