Tarun Bharat

ऑलिंपिकला जाणाऱया ऍथलीट्ससाठी गटागटाने सरावाची योजना

Advertisements

वृत्तसंस्था / नवी दिल्ल्ली

टोकियो ऑलिंपिकसाठी जाणाऱया ऍथलीट्सकरिता भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाच्या (साई) केंद्रामध्ये क्वारंटाईन नंतरही गटागटाने सराव चालू राहणार असल्याचे सांगण्यात आले. देशातील कोरोना परिस्थिती बिकट होत असल्याने साईने खेळाडूंसाठी सर्व खबरदारीचे उपाय अंमलात आणले आहेत.

टोकियो ऑलिंपिकला जाणाऱया खेळाडूंची प्रत्येक आठवडय़ात कोरोनाची चाचणी घेतली जात असून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जाते. या खेळाडूंच्या सरावात कोणताही अडथळा येवू नये याची काळजी साईकडून घेतली जात आहे. या आगामी स्पर्धेपूर्वी खेळाडूंना सरावाची नितांत गरज आहे. दरम्यान साईच्या संकुलामध्ये सराव करताना खेळाडूंचे विविध गट केले जात आहेत. गटागटाने त्यांना सरावाची संधी दिली जात आहे.

Related Stories

मी निवृत्त झालेली नाही’ ः सेरेना

Patil_p

ऑलिम्पिकला जाणाऱ्या भारतीय पथकाचे पूर्ण लसीकरण होणार

Amit Kulkarni

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी नेमारचे 10 लाख डॉलर्स

Patil_p

विंडीज संघाची आगेकूच मालिका विजयाकडे

Patil_p

धोनीला हवी होती आणखी एकदा नाणेफेक : संगकारा

Patil_p

विंडीजच्या विजयात ब्रुक्स, पोलार्ड यांची चमक

Patil_p
error: Content is protected !!