Tarun Bharat

ऑलिंपिकला जाणाऱया भारताच्या नेमबाज, प्रशिक्षक, अधिकाऱयांचे लसीकरण

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी जाणाऱया भारताच्या अनेक नेमबाजांना, प्रशिक्षकांना आणि संबंधित अधिकाऱयांना गुरूवारी कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला.

11 मे रोजी क्रोएशियातील झाग्रेब येथे जाण्यापूर्वी भारतीय नेमबाजांना कोरोनाचा पहिला डोस गुरूवारी देण्यात आला. क्रोएशियात होणाऱया युरोपियन चॅम्पियन्सशीप नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाज सहभागी होणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय रायफल संघटनेच्या प्रवक्त्याने दिली. गेल्या महिन्यात भारतीय नेमबाज संघातील काही सदस्यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. त्यामध्ये पिस्तुल नेमबाज मनु भाकर आणि अंजुम मोदगील यांचा समावेश आहे. समरेश जंग, सुमा शिरूर, दिपाली देशपांडे यांना गेल्या महिन्यांतच कोरोनाची लस देण्यात आली होती. मनु भाकरला तीन महिन्यापूर्वी हरियाणातील शासकीय रूग्णालयात कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला होता. क्रोएशियामधील युरोपियन चॅम्पियन्सशीप नेमबाजी स्पर्धा 20 मे ते 6 जून दरम्यान होणार आहेत. या स्पर्धेनंतर भारतीय नेमबाज झाग्रेबमध्ये नेमबाजीचा सराव करणार असून त्यानंतर ते क्रोएशियातून थेट टोकियो ऑलिंपिकमध्ये दाखल होणार आहेत. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे 15 नेमबाज सहभागी होणार आहेत. भारतीय नेमबाजांचे झाग्रेबला चार्टर फ्लाईटने प्रयाण होणार आहे.

Related Stories

बलाढय़ चेन्नई सुपरकिंग्सची ‘रॉयल’ धुलाई!

Patil_p

बाला रफिक व अभिजित कटकेची दमदार सुरुवात

Patil_p

अँटवर्प संघाकडे बेल्जियन फुटबॉल चषक

Patil_p

शकीब अल हसनला टी-20 मालिका हुकणार

Patil_p

कोल्हापूरची टेबल-टेनिसस्टार वैष्णवीचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

Abhijeet Khandekar

इंग्लंड दौऱ्यातील भारतीय महिला संघाचा पहिला विजय

Patil_p