Tarun Bharat

ऑलिम्पिक पदक विजेत्या मीराबाई चानूला रेनो इंडियाकडून स्पोर्ट्स कार भेट

ऑनलाईन टीम / मुंबई :

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई करणारी प्रसिद्ध वेटलिफ्टर सैखोम मीराबाई चानू हिचा रेनो काइगर ही कार भेट देऊन सन्मान करण्यात आला. पूर्व इंफाळमधील एका गावातील रहिवासी असलेल्या मीराबाईने संपूर्ण देशाला गौरवान्वति केले. स्वतःची जिद्द आणि वचनबद्धतेच्या जोरावर पदक मिळवणारी मीराबाई चानू इतर अनेक खेळाडूंसाठी प्रेरणास्थान ठरली आहे.

तिच्या या कौतुकास्पद कार्याबद्दल रेनो इंडियाकडून मीराबाई चानू सन्मान करत तिला स्पोर्ट्स कार काइगर भेट देण्यात आली आहे. रेनो इंडियाचे उपाध्यक्ष सुधीर मल्होत्रा यांच्या हस्ते नव्या कोऱया रेनो काइगरच्या चाव्या रौप्य पदक विजेत्या सैखोम मीराबाई चानूकडे बुधवाली सुपूर्द करण्यात आल्या.

रेनो इंडियाने भारतात आपल्या कामगिरीची दिमाखदार दहा वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांच्या दहाव्या वर्धापन दिनाच्या जल्लोषाचा भाग म्हणून रेनो इंडियाने रेनो काइगरचे आरएक्सटी (ओ) वेरीयंट लॉन्च केले. यावेळी मीराबाई चानू हिचा सन्मान करणे ही रेनोसाठी सन्मानाची बाब आहे, अशा भावना कंपनीने व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे खाते उघडणाऱया वेटलिफ्टर मीराबाई चानूवर कौतुकाचा वर्षाव झाला. 49 किलो वजनी गटात मीराबाई चानूने रौप्य पदकाची कमाई केली. वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात तिने पहिल्याच दिवशी पदक पटवण्याचा पराक्रम केला आहे. यापूर्वी मणिपूर राज्य सरकारने तिला 1 कोटी रुपये रोख बक्षीस दिले. तेव्हापासून बक्षीसांचा ओघ सुरूच असून आज मीराबाई चानूला कार भेट म्हणून मिळाली आहे.

Related Stories

रोहित शर्माच्या जागी ईश्वरन

Amit Kulkarni

आरपीडी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा कार्यक्रम

Patil_p

खुन्नस देण्यावरून युवकाचा खून

Patil_p

किवीज यष्टीरक्षक-फलंदाज वॅटलिंगची निवृत्तीची घोषणा

Patil_p

विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताला 7 पदके

Patil_p

एजाझ पटेल न्यूझीलंड संघाबाहेर

Amit Kulkarni