Tarun Bharat

ऑल इंडिया चॅम्पियन मल्ल नामदेव पाटील यांचे निधन

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

ऐंशीच्या दशकात कुस्ती गाजविणारे अव्वल मल्ल ऑल इंडिया चॅम्पियन पै. नामदेव उर्फ रामचंद्र दत्तू हुजरे-पाटील (वय 75, रा. महे, ता. करवीर) यांचे शनिवारी दुपारी निधन झाले. गेले काही दिवस ते मुत्रविकाराने आजारी होते. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, भाऊ, पुतणे असा परिवार आहे. महे गावातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन शनिवारी (दि. 6) सकाळी आहे.

महे गावातील हुजरे-पाटील घराण्यात जन्मलेल्या पाटील यांचे नाव रामचंद्र होते. पण ते नामदेव पाटील नावाने प्रसिद्ध होते. ऐंशीच्या दशकांत अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेत त्यांनी चॅम्पियनचा किताब मिळविताना सुवर्णपदकावर कब्जा केला होता. ही स्पर्धा सलगपणे गाजविल्यानंतर नामदेव पाटील यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अधिवेशनातही चमक दाखविली. प्रारंभी 74 आणि नंतर 82 किलो वजन गटात त्यांनी सुवर्णपदके संपादन केली. त्याचबरोबर जंगी कुस्ती मैदानेही त्यांनी गाजविली होती. नव्वदच्या दशकाच्या प्रारंभी झालेल्या अपघातानंतर त्यांची कुस्ती संपुष्टात आली. पण त्यांनी कुस्तीशी नाते कायम ठेवले. युवा मल्लांना प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांनी जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकारी म्हणूनही जबाबदारी पार पाडली. सध्या ते तालीम संघाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

तालीम संघाच्यावतीने शोक व्यक्त

नामदेव पाटील यांच्या निधनाने कुस्ती पंढरी कोल्हापूरने अव्वल मल्ल गमावला आहे. त्यांच्या जाण्याने कुस्तीचे नुकसान झाले आहे. युवा मल्लांना प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देण्याबरोबरच तालीम संघाच्या कार्यात त्यांचा सहभाग होता, अशा शब्दात तालीम संघाचे सर्वेसर्वा बाळ गायकवाड यांनी नामदेव पाटील यांच्या विषयी भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.

कर्तारसिंहबरोबर दोन कुस्त्या

अ. भा. आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेत नामदेव पाटील यांचा एwशीच्या दशकात दरारा होता. त्यांनी सुवर्णपदके मिळविताना उत्तरेतील मल्लांना पराभूत केले होते. कर्तारसिंहबरोबरही त्यांच्या दोन कुस्त्या झाल्या होत्या. नंतर कर्तारसिंह सत्पालच्या बरोबरीने देशात प्रसिद्ध झाला होता.

Related Stories

Kolhapur : जिल्हय़ातील 479 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे 15 सप्टेबरनंतर बिगुल

Abhijeet Khandekar

MP Darhysheel Mane : ‘हातकणंगले’ मतदारसंघातील ‘नळपाणी’ योजनांसाठी 423 कोटी मंजूर

Abhijeet Khandekar

कोल्हापूर उत्तर मतदारसंघ पोट निवडणूक जाहीर; १२ एप्रिलला मतदान

Abhijeet Shinde

बांधकामचे कर्मचारी पाच वाजताच गायब

Abhijeet Shinde

कणेरी परिसरात सापडले दोन कोरोना रुग्ण

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्हय़ात डॉक्टरसह 15 कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!