Tarun Bharat

ऑल इंडिया परमिट आता ऑनलाईन

1 एप्रिलपासून लागू होणार नवा नियम, व्हेईकल ऑपरेटर्सना सुविधा ः रस्ते परिवहन मंत्रालयाची योजना

वृत्तसंस्था  / नवी दिल्ली

जर तुम्ही टूरिस्ट व्हेईकल ऑपरेटर असाल तर हे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण वृत्त आहे. रस्ते परिवहन मंत्रालयाने टूरिस्ट व्हेईकल ऑपरेटर्ससाठी ऑल इंडिया परमिट प्रदान करण्यासंबंधी एक नवी योजना सुरू केली आहे. ही योजना 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. ही योजना लागू झाल्यावर टूरिस्ट ऑपरेटर्सना परमिटसाठी आरटीओ कार्यालयाच्या फेऱया माराव्या लागणार नाहीत.

रस्ते परिवहन मंत्रालयानुसार आता टूरिस्ट व्हेईकल ऑपरेटर ऑनलाईन अर्जाद्वारेही ऑल इंडिया परमिट मिळवू शकणार आहेत. अर्जासह सर्व आवश्यक दस्तऐवज आणि शुल्कही ऑनलाईन जमा करता येणार आहे. या पूर्ण प्रक्रियेच्या 30 दिवसांच्या आत परमिट प्रदान करण्यात येणार आहे. नवा नियम लागू झाल्यावरही पूर्वीचा परवाना स्वतःच्या वैध कालावधीपर्यंत लागू राहणार आहे. नव्या नियमांना ‘ऑल इंडिया टूरिस्ट व्हेईकल्स ऑथरायजेशन अँड परमिट रुल्स-2021’ नाव देण्यात आले आहे.

पर्यटनाला चालना

राज्यांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी नवे नियम सादर करण्यात आले आहेत. या नव्या नियमांमुळे राज्यांच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे. परिवहन विकास परिषदेच्या 39 व्या आणि 40 व्या बैठकीत राज्यांसोबत विचारविनिमय केल्यावर हे नवे नियम आणले गेल्याचे केंद्रीय मंत्रालयाने म्हटले आहे.

3 महिने ते 3 वर्षांचा कालावधी

या योजनेत टूरिस्ट व्हेईकल ऑपरेटर्सना कालावधीची लवचिकता देण्यात आली आहे. याअंतर्गत ऑपरेटरला किमान तीन महिने तर कमाल 3 वर्षांच्या कालावधीकरिता परमिट देण्यात येणार आहे. काही क्षेत्रांमध्ये पर्यटनाचा हंगाम छोटा असणे आणि काही ऑपरेटर्सची आर्थिक स्थिती अधिक चांगली नसल्याने तीन महिन्यांची व्यवस्था लागू करण्यात आली आहे. याचबरोबर सर्व राज्यांच्या परवाना शुल्काचा एक डाटाबेस तयार करण्यात येणार आहे.

पर्यटनाचे प्रमाण वाढले

मागील 15 वर्षांमध्ये देशातील पर्यटनात अनेक पटींनी झालेली वाढ पाहता मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे. पर्यटनातील या वृद्धीत देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय दोन्ही प्रकारच्या पर्यटनाचे योगदान आहे. व्यवसाय सुलभतेला बळ देण्यासाठीही हे पाऊल अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे मानले जात आहे.

Related Stories

केंद्राकडून शालेय दप्तरविषयक धोरण जाहीर

Omkar B

जनता राग व्यक्त करू लागल्याने शिवसेना हादरून गेली : नारायण राणे

Tousif Mujawar

डोळे बंद करून नेत्याचा प्रचार

Patil_p

ज्ञान, संशोधन, नवोन्मेषाची ही वेळ!

Amit Kulkarni

गुलाम नबी आझाद यांच्या पक्षाचं नाव ठरलं!, अजेंडाही सांगितला…

datta jadhav

उपचार नाकारल्यास बडतर्फीची कारवाई

Patil_p