Tarun Bharat

ऑस्ट्रियाचा थिएम अंतिम फेरीत, महिला दुहेरीत लॉरा-व्हेरा विजेते

पॅरिस

 अमेरिकन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पुरुष एकेरीत ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिएमने अंतिम फेरी गाठली तर महिला दुहेरीत जर्मनीची लॉरा सिएगेमंड व रशियाची व्हेरा झोनारेव्हा यांनी जेतेपदावर आपली मोहोर उमटवली. पुरुष एकेरीतील अंतिम लढतीत थिएमची लढत झेरेव्हविरुद्ध होणार आहे.

ऑर्थर ऍशे स्टेडियमवरील उपांत्य लढतीत द्वितीय मानांकित थिएमने रशियाच्या डॅनिएल मेदव्हेदेव्हविरुद्ध 6-2, 7-6 (9/7), 7-6 (7/5) अशा सरळ सेटसमध्ये 2 तास 56 मिनिटातच विजय संपादन केला. 27 वर्षीय थिएम आज होणाऱया फायनलमध्ये जर्मनीच्या झेरेव्हविरुद्ध लढा देईल. या उभयतांपैकी कोणीही जेतेपद मिळवले तरी त्यांचे ते पहिलेवहिले ग्रँडस्लॅम जेतेपद असेल, हे निश्चित आहे.

मेदव्हेदेव्हने थिएमविरुद्ध काही वेळा उत्तम खेळ साकारला. पण, निर्णायक क्षणी या उत्तम खेळाचे त्याला गुणात रुपांतर करता आले नाही. या उभयतांनी येथील लढतीत बेसलाईन फोरहँड फटक्याच्या बळावर लाँग रॅलीजवर भर दिला. या दोघांनी अगदी बचावात्मक खेळातही चुणूक दाखवली. मेदव्हेदेव्हने दुसऱया सेटमध्ये एकवेळ 4-2 अशी आघाडी जरुर मिळवली होती. पण, नंतर त्याला आपला वरचष्मा कायम राखता आला नाही. तिसऱया सेटमध्येही मेदव्हेदेव्ह 5-3 अशा फरकाने आघाडीसह सेट जिंकण्याच्या उंबरठय़ावर होता. पण, 38 फटक्यांची रॅली थिएमने जिंकली आणि नंतर जोरदार पुनरागमन करत विजयावर शिक्कामोर्तब केले.

महिला दुहेरीत लॉरा-व्हेराची बाजी

जर्मनीची लॉरा सिएगेमंड व रशियाची व्हेरा झोनारेव्हा या जोडीने महिला दुहेरीतील जेतेपद पटकावले. या जोडीने अमेरिकेची निकोल मेलिशर व चीनची यिफान क्झू यांचा 6-4, 6-4 अशा सरळ सेटस्मध्ये फडशा पाडला. सिएगेमंडसाठी हे दुहेरीतील पहिले तर झोनारेव्हासाठी तिसरे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. झोनारेव्हाने यापूर्वी 2006 मध्ये नथाली डेचीसह अमेरिकन तर 2012 मध्ये स्वेतलाना कुझनेत्सोव्हासह ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम जिंकले होते.

Related Stories

प्रो लीग महिला हॉकी : भारत-अमेरिका लढत आज

Patil_p

‘पॉझिटिव्ह’ हाफीज 24 तासांच्या आतच ‘निगेटिव्ह’!

Patil_p

भारतीय फिरकी मारा हे सर्वांत कठीण आव्हान ः ख्वाजा

Patil_p

मुंबई इंडियन्स-गुजरात जायंट्स सलामीची लढत

Patil_p

स्पेनचा बसक्वेट्स फुटबॉल क्षेत्रातून निवृत्त

Patil_p

दक्षिण आफ्रिकेचा बांगलादेशवर एकतर्फी मोठा विजय

Patil_p