Tarun Bharat

ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम आजपासून

Advertisements

वृत्तसंस्था/ मेलबोर्न

ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेला येथे सोमवारपासून प्रारंभ होत आहे. ग्रॅण्ड स्लॅम टेनिसच्या नव्या दशकामध्ये नवोदित युवा टेनिसपटूंच्या पिढीचे नेतृत्व अनुभवी टेनिसपटू सर्बियाचा जोकोव्हिक आणि अमेरिकेची सेरेना विलीयम्स करीत आहे.

ऑस्ट्रेलियातील अलिकडेच्या वणव्याच्या दुर्घटनेनंतर मेबोर्न परिसरातील हवामान पूर्वीसारखे सुरळीत झाले आहे. सेरेना विलीयम्सने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत 23 ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली असून आता ती मार्गारेट कोर्टच्या 24 ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपदाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी करण्यासाठी सज्ज झाली आहे. नव्या वर्षांतील या पहिल्या ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत पुरूष विभागात जोकोव्हिक तर महिला विभागात सेरेना विलीयम्स यांना बुकींकडून संभाव्य विजेते म्हणून पसंती मिळाली आहे. स्पेनचा टॉप सीडेड 36 वर्षीय नादाल हा ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेच्या तिसऱया दशकात अग्रस्थानावर आहे तर स्वीसचा 38 वर्षीय रॉजर फेडरर आपले 21 वे ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद मिळविण्यासाठी आतुरलेला आहे. 2010 च्या तुलनेत 2020 च्या टेनिस दशकामध्ये खूपच फरक जाणवतो. फेडरर आणि नादाल यांनी चार ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे तर सेरेनाने मेलबोर्न आणि विंबल्डन स्पर्धा जिंकली होती. ग्रॅण्ड स्लॅम टेनिसच्या 10 वर्षांच्या कालावधीनंतर पुरूष गटातील आघाडीच्या तीन टेनिसपटूंनी मानांकनात पहिले तीन क्रमांक राखले आहेत. 2003 साली फेडररने पहिली ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकल्यानंतर त्यानंतरच्या कालावधीत पाच प्रमुख स्पर्धांमधील अंतिम फेरीत फेडरर, नादाल किंवा जोकोव्हिक यांचे वर्चस्व राहू शकले नाही. 38 वर्षीय सेरेनाने 2017 साली मेलबोर्नमध्ये आपले 23 वे  ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद पटकाविले आहे. गेल्यावर्षी जोकोव्हिक आणि नादाल यांच्यात ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद विभागण्यात आले. ऑस्ट्रीयाचा थिएम, रशियाचा मेदव्हेदेव आणि इटलीचा फॉगनेनी तसेच ग्रीसच्या 21 वर्षीय सिटसिपेसने पहिल्यांदा मास्टर्स टेनिस स्पर्धेतील विजेतेपद मिळविले.

सोमवारपासून सुरू होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत पहिल्या फेरीत अनुभवी आणि वयस्कर तसेच नव्या युवा टेनिसपटूंमध्ये वर्चस्वासाठी लढती होतील. 40 वर्षीय व्हिनसचा सलामीचा सामना आपल्याच देशाच्या 25 वर्षीय गॉफशी होणार आहे. जपानची 22 वर्षीय ओसाका ही या स्पर्धेतील विद्यमान विजेती असून ती आता जेतेपद सलग दुसऱयावर्षी राखण्याचा प्रयत्न करेल. ऑस्ट्रेलियाची टॉप सीडेड बार्टी हिला जेतेपद मिळविण्यासाठी झगडावे लागेल.

Related Stories

नितीन मेनन ठरले आयसीसीचे सर्वांत युवा पंच

Patil_p

बांगलादेश-लंका कसोटी सामना अनिर्णित

Patil_p

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू हँड्सकॉम्बला कोरोनाची लागण

Patil_p

भारतीय महिला संघाला मिळाली बक्षीस रक्कम

Patil_p

टोकियो पॅरालिम्पिक्ससाठी भारतीय पथक रवाना

Amit Kulkarni

Tokyo Paralympics: टेबल-टेनिसमध्ये सोनलबेन आणि भाविना पटेल पराभूत

Archana Banage
error: Content is protected !!