Tarun Bharat

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू हँड्सकॉम्बला कोरोनाची लागण

वृत्तसंस्था/ मेलबर्न

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पीटर हँड्सकॉम्ब याला कोरोनाची बाधा झाल्याने तो इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धेतील काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. मिडलसेक्स संघाचे नेतृत्व हँड्सकॉम्बकडे सोपविण्यात आले होते.

30 वर्षीय हँड्सकॉम्ब हा सध्या इंग्लंडमध्ये इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धेत खेळत आहे. हँड्सकॉम्बची कोरोना चाचणी घेण्यात आली आणि त्यामध्ये तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्याला आता काही दिवसासाठी आयसोलेशनमध्ये रहावे लागणार असल्याने त्याला या स्पर्धेतील लिसेस्टरशायरविरूद्धच्या सामन्यात खेळता  येणार नाही. 2019 च्या जानेवारीमध्ये हँड्सकॉम्बने भारताविरूद्धच्या सिडनीतील कसोटी सामन्यात आपला सहभाग दर्शविला होता. तसेच त्याने आपला शेवटचा टी-20 सामना 2019 च्या फेब्रुवारीमध्ये बेंगळूर येथे भारताविरूद्ध खेळला होता. हँड्सकॉम्बने आपला शेवटचा वनडे सामना 2019 च्या जुलैमध्ये इंग्लंडविरूद्ध खेळला होता.

Related Stories

टी-20 विश्वचषकाबाबत निर्णय लवकरच

Patil_p

ऑस्ट्रेलिया-स्वीस यांच्यात अंतिम लढत

Patil_p

न्यूझीलंडचा 2023 साली पाकचा दौरा

Patil_p

प्रेवलरच्या निर्णायक गोलने स्वित्झर्लंड ‘नॉकआऊट’ मध्ये दाखल

Patil_p

लॉकडाऊनमध्ये सराव, रोनाल्डोला समज

Patil_p

ऑलिम्पिक मल्ल सुमित मलिकवर 2 वर्षांची बंदी

Patil_p