Tarun Bharat

ऑस्ट्रेलियन क्रिकेटला आर्थिक फटका

Advertisements

वृत्तसंस्था/ सिडनी

कोरोना महामारी संकटामुळे ऑस्ट्रेलियातील सर्व व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मोठय़ा आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार असल्याचे मंडळाचे प्रमुख केव्हिन रॉबर्टस् यांनी सांगितले.

कोव्हिड-19 संकटामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सर्व योजना ठप्प झाल्या असून ऑस्ट्रेलियातील विविध राज्यस्तरीय क्रिकेट संघटनांनी गेल्या काही आठवडय़ांच्या कालावधीत  कर्मचारी कपात केली आहे. नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर जाणार असून या दौऱयामध्ये 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळविली जाणार आहे. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱयामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या आर्थिक स्थितीमध्ये निश्चितच सुधारणा होईल, असा विश्वास रॉबर्टस् यांनी व्यक्त केला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सध्या 43.13 दशलक्ष पौंडस् रकमेची गरज आहे. त्यामुळे येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणाऱया आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे ऑस्ट्रेलियाला यजमानपद भूषविणे शक्य होणार नाही, असेही रॉबर्टस् यांनी सांगितले.

Related Stories

पाकिस्तानला हरवून ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत

Patil_p

मेदव्हेदेवकडून जोकोव्हिचला धक्का

Patil_p

किदांबी श्रीकांतची उपांत्य फेरीत धडक

Patil_p

दुसरी कसोटी अनिर्णित राहण्याची शक्यता

Omkar B

इंग्लंड-द. आफ्रिका दुसरी कसोटी आजपासून

Patil_p

अन्य भारतीयांची कामगिरी

Patil_p
error: Content is protected !!