Tarun Bharat

ऑस्ट्रेलियन ग्रां प्रि मध्ये फेरारीचा लेक्लर्क विजेता

विजेता रेड बुलचा पेरेझ दुसरा, मर्सिडीजचा रसेल तिसरा

वृत्तसंस्था/ मेलबर्न

फेरारीच्या चार्लस लेक्लर्कने रविवारी येथे झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रां प्रि फॉर्म्युला वन शर्यतीचे जेतेपद मिळवित वैयक्तिक व फेरारीची चॅम्पियनशिपमधील आघाडी आणखी भक्कम केली. रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेननेला मागील तीनपैकी दुसऱया शर्यतीत निवृत्त व्हावे लागले तर त्याचाच संघसहकारी सर्जिओ पेरेझने दुसरे व मर्सिडीजच्या जॉर्ज रसेलने तिसरे स्थान मिळविले.

येथील अल्बर्ट पार्कवर झालेल्या या शर्यतीला प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. 1100 दिवसानंतर येथे झालेली ही पहिलीच शर्यत होती. सराव आणि पात्रतेमध्ये शौकिनांना ऍक्शनपॅक्ड शर्यत पहावयास मिळाली होती. रविवारीदेखील त्यांना रोमांचक शर्यत पाहण्याची संधी मिळाली. लेक्लर्कने व्हर्स्टापेनला मागे ठेवत आघाडी कायम राखली होती. त्याचा संघसहकारी कार्लोस सेन्झच्या कारने दुसऱया लॅपवेळी गिरकी घेतली तर सेबॅस्टियन व्हेटेलची कार 23 व्या लॅपवेळी क्रॅश झाली. 39 व्या लॅपवेळी व्हर्स्टापेनच्या कारच्या इंजिनमधून धूर येऊ लागल्याने त्याला शर्यतीतून बाहेर पडावे लागले.

मर्सिडीजच्या हॅमिल्टनने चौथे, मॅक्लारेनच्या लँडो नॉरिसने पाचवे, मॅक्लारेनच्या डॅनियल रिकार्डोने सहावे, अल्पाईनच्या एस्टेबन ओकॉनने सातवे, अल्फा रोमिओच्या व्हाल्टेरी बोटासने आठवे, अल्फा टॉरीच्या गॅसलीने नववे व विल्यम्सच्या अल्बॉनने दहावे स्थान मिळवित एक गुण घेतला.

Related Stories

व्हेरेव्हला 40 हजार डॉलर्सचा दंड

Patil_p

महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी इंडोनेशिया पात्र

Amit Kulkarni

ऍग्युरो बार्सिलोनाशी करारबद्ध

Amit Kulkarni

बेंगलोर एफसीचा स्पर्धेत पहिला विजय

Patil_p

कोलकात्यात खेळताना प्रचंड दडपण असायचे : छेत्री

Patil_p

आयपीएलची सुरुवात 29 मार्चपासून

Patil_p