वृत्तसंस्था/ मेलबोर्न
2021 सालातील ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धा कोरोना महामारीच्या भीतीमुळे लांबणीवर टाकली जाईल, असे वृत्त येथील एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केले आहे पण या वृत्ताला टेनिस ऑस्ट्रेलियाकडून दुजोरा मिळालेला नाही.
ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेसाठी आतापासूनच मेलबोर्नमध्ये पूर्व तयारीला प्रारंभ झाला आहे. कोरोना महामारी समस्येला तोंड देण्यासाठी सर्व नियमांची सक्ती केली जाणार आहे. या स्पर्धेच्या निश्चित तारखेबाबत कोणतीही बैठक स्पर्धा आयोजकांकडून घेण्यात आलेली नाही. या स्पर्धेसाठी विविध देशांचे टेनिसपटू डिसेंबरच्या उत्तरार्धात ऑस्ट्रेलियात दाखल होत असतात. आता या टेनिसपटूंसाठी दोन आठवडय़ांच्या कालाटवधीकरता क्वारंटाईन सक्तीचे केले जाणार आहे. मात्र ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा लांबणीवर टाकण्याच्या बातमीला स्पर्धा आयोजकांकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होवू शकली नाही.