Tarun Bharat

ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेतून अँडी मरेची माघार

वृत्तसंस्था/ मेलबोर्न

ब्रिटनचा माजी टॉप सीडेड टेनिसपटू तसेच पाचवेळा ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत एकेरीची अंतिम फेरी गाठणारा अँडी मरेने फेब्रुवारी महिन्यात सुरू होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतून माघार घेतल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली.

ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धा 8 फेब्रुवारीपासून खेळविली जाणार आहे. विविध देशांच्या टेनिसपटूंचे चार्टर विमानाने येथे यापूर्वीच आगमन झाले आहे. ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर सर्व टेनिसपटूंना 14 दिवसांसाठी सक्तीचे क्वारंटाईन करण्यात येत आहे. यावेळी अँडी मरेला या स्पर्धेत वाईल्डकार्डद्वारे प्रवेश देण्यात आला होता. क्वारंटाईनच्या कालावधीत आपल्याला काही अडचणी येत असल्याने या स्पर्धेतून आपण माघार घेतल्याचे मरेने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. मरेने 2010, 2011, 2013, 2015 आणि 2016 साली ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते.

Related Stories

सुशीलकुमार, पुजा धांडा यांच्या कराराचे नूतनीकरण अनिश्चित

Patil_p

भारत-बेलारुस फुटबॉल लढत आज

Patil_p

लंका टी-20 मालिकेसाठी हार्दिक पंडय़ाकडे नेतृत्व?

Amit Kulkarni

झगडणाऱया राजस्थान रॉयल्सची आज मुंबईविरुद्ध ‘लिटमस टेस्ट’

Patil_p

दुसऱया सामन्यातही भारताची जर्मनीवर मात

Patil_p

सूर्यकुमार यादव आयपीएल स्पर्धेतून बाहेर

Patil_p