Tarun Bharat

ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतून ब्रॅडीची माघार

वृत्तसंस्था/ मेलबोर्न

2022 च्या टेनिस हंगामातील येथे जानेवारी महिन्यात होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेतून अमेरिकेची महिला टेनिसपटू जेनीफर ब्रॅडीने दुखापतीमुळे माघार घेतल्याची माहिती रविवारी स्पर्धा आयोजकांनी दिली आहे.

अमेरिकेच्या ब्रॅडीच्या डाव्या पायाला दुखापत झाली असून ती अद्याप पूर्णपणे बरी झाली नसल्याने तिने आगामी ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचे स्पर्धा आयोजकांना कळविले आहे. 2021 च्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत  ब्रॅडीने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. अमेरिकेची माजी टॉप सीडेड सेरेना विलीयम्स तसेच कॅनडाच्या बिनाका अँड्रेस्क्यूने ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतून दुखापतीमुळे माघार घेतली आहे. कोरोना महामारी समस्येमुळे गेल्यावर्षी अनेक अव्वल टेनिसपटू या स्पर्धेत सहभागी झाले नव्हते.

Related Stories

फिफाच्या मानांकन यादीत सलग तिसऱयांदा बेल्जियम आघाडीवर

Patil_p

सिंधूची विजयाने, श्रीकांतची पराभवाने सांगता

Patil_p

हॉकी फाईव्ह स्पर्धेत भारतीय संघांची सत्त्वपरीक्षा

Patil_p

माँट्रियल टेनिस स्पर्धेत इटलीची जॉर्जी विजेती

Patil_p

ऍथलीटस्चे आऊटडोअर प्रशिक्षण आजपासून

Patil_p

निवड समितीच्या अध्यक्षपदी चेतन शर्मा यांची फेरनियुक्ती

Patil_p