Tarun Bharat

ऑस्ट्रेलियन संघात एलीस पेरीला स्थान

मेलबोर्न / वृत्तसंस्था

येत्या सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाचा महिला क्रिकेट संघ न्यूझीलंडच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयामध्ये उभय संघात वनडे आणि टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. या दौऱयासाठी ऑस्ट्रेलियाचा 18 खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला असून अष्टपैलू एलीस पेरीचा समावेश करण्यात आला आहे. एलीसला यापूर्वी दुखापत झाली होती. त्यामुळे तंदुरूस्ती चाचणीनंतरच तिचा संघातील समावेश निश्चित होईल.

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघामध्ये तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळविले जाणार आहेत. 2019 साली ऑस्ट्रेलिया महिला संघाने न्यूझीलंडचा 3-0  असा पराभव करून वनडे मालिका जिंकली होती.

ऑस्ट्रेलिया महिला संघ- मेग लॅनींग (कर्णधार), हेन्स (उपकर्णधार), ब्राऊन, बर्न्स, कॅरे, गार्डनर, हिली, जोनासेन, किमेन्सी, मॅकग्रा, मोलीनेक्स, मुनी, एलीस पेरी, स्कूट, स्ट्रेनो, सदरलॅन्ड, वेरहॅम आणि वेकारेवा

Related Stories

वळिवाने तालुक्याच्या पश्चिम भागाला झोडपले

Amit Kulkarni

पिरनवाडी येथे तरुणीची आत्महत्या

Omkar B

पोलीस आयुक्तांकडून मिरवणूक मार्गाची पाहणी

Omkar B

शहरातील गर्दी ठरतेय चिंताजनकच

Amit Kulkarni

आता उच्च न्यायालयाकडूनही हलगा- मच्छे बायपासला स्थगिती

Tousif Mujawar

जेएमएफसी प्रवेशद्वाराच्या गेटची केली पाहणी

Amit Kulkarni