Tarun Bharat

ऑस्ट्रेलियाचा द. आफ्रिकेला धक्का

आयसीसी महिला वनडे क्रिकेट विश्वचषक : मेग लॅनिंगचे नाबाद शतक

वेलिंग्टन / वृत्तसंस्था

मेग लॅनिंगने नाबाद 135 धावांची झंझावाती शतकी खेळी साकारल्यानंतर ऑस्ट्रेलियाने आयसीसी महिला क्रिकेट वनडे विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीत दक्षिण आफ्रिकेला 5 गडी राखून नमवत आपली अपराजित घोडदौड कायम राखली. प्रारंभी, लॉरा वुलव्हार्टने 90 धावांची आक्रमक खेळी साकारल्यानंतर दक्षिण आप्रेकेने 5 बाद 271 धावांचा डोंगर रचला होता. पण, प्रत्युत्तरात लॅनिंगच्या धडाकेबाज शतकामुळे ऑस्ट्रेलियाने 45.2 षटकात 5 बाद 272 धावांसह सहज विजय संपादन केला. मेग लॅनिंगने 130 चेंडूत 15 चौकार, 1 षटकारासह 135 धावांची नाबाद खेळी साकारली.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीला पाचारण केले. वुलव्हार्ट व लिझेले ली यांनी 88 धावांची सर्वोच्च भागीदारी नोंदवली. नंतर लिझेले 44 चेंडूत 36 धावांवर बाद झाली होती.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण आफ्रिका ः 50 षटकात 5 बाद 271 (लॉरा वुलव्हार्ट 134 चेंडूत 6 चौकारांसह 90, सुने लूस 51 चेंडूत 6 चौकारांसह 52, लिझेले 36. स्कट, जोनास्सन, गार्डनर, ऍनाबेल, ऍलाना प्रत्येकी 1 बळी).

ऑस्ट्रेलिया ः 45.2 षटकात 5 बाद 272 (मेग लॅनिंग 130 चेंडूत 15 चौकार, 1 षटकारासह नाबाद 135, ताहिला मॅकग्रा 35 चेंडूत 32. अवांतर 18. शबनीम इस्माईल 2-33, ट्रियॉन 2-44).

Related Stories

विश्व युवा तिरंदाजी स्पर्धेत भारताचे दोन नवे विश्वविक्रम

Amit Kulkarni

कसोटी मानांकनात विराट कोहलीची दुसऱया स्थानावर झेप

Patil_p

जेव्हा धोनीने ‘त्या’ चाहत्याशी संपर्क साधला!

Omkar B

वजन घटवण्यासाठी भालाफेक करणारा नीरज सुवर्ण विजेता!

Patil_p

पैलवानांनो, मेहनत कमी पडू देऊ नका

Patil_p

बांगलादेश संघ पाकमध्ये दाखल

Patil_p