Tarun Bharat

ऑस्ट्रेलियाच्या रेस्टॉरंट्समध्ये कर्मचाऱयांची टंचाई

एक तासासाठी 4 हजार रुपयांची ऑफर तरीही मिळेनात कर्मचारी

ऑस्ट्रेलियाच्या पर्थमधील रेस्टॉरंट्स सध्या कर्मचाऱयांच्या टंचाईला तोंड देत आहेत. स्वतःच्या पूर्ण क्षमतेने ग्राहकांना सेवा देता येईल इतपत कर्मचारी त्यांच्याकडे नाहीत. याचमुळे पर्थमधील एक इटालियन फाइन-डायनिंग रेस्टॉरंट कर्मचाऱयांसाठी इतके आतुर आहे की त्याने वेटर्सना 55 डॉलर्स प्रतितास देण्याची ऑफर दिली आहे. ही रक्कम सरासरीच्या जवळपास तीनपट अधिक आहे.

कोरोना महामारीमुळे पर्थच्या सीमा बंद आहेत. कोरोना निर्बंधांमुळे अन्य ठिकाणांहून काम करण्यासाठी येणारे कर्मचरी शहर सोडून स्वतःच्या घरी परतले आहेत. अशा स्थितीत शहरातील अनेक रेस्टॉरंट्सना मोठय़ा वेतनाची ऑफर देऊनही काम करण्यासाठी लोक मिळेनासे झाले आहेत.

‘अनुभवी’, ‘अत्याधिक प्रेरित’ आणि ‘चांगल्याप्रकारे सज्ज’ वेटर स्टाफची गरज आहे. याकरता प्रतितास 55 डॉलर्सपर्यंत रक्कम देण्यास तयार आहोत असे वेस्ट पर्थ रेस्टॉरंटच्या ऑनलाइन जॉब ऍडव्हरटाइजमेंटमध्ये म्हटले गेले आहे. महामारीदरम्यान पर्थमधील अनेक रेस्टॉरंट्स पूर्वीपेक्षा अधिक वेतन देत आहेत.

मनुष्यबळाचा अभाव

वेतनात मोठी वाढ करूनही आमच्या क्षेत्रातील हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री किती गंभीर मनुष्यबळ संकटात सापडले आहे हे समजते. कर्मचाऱयांच्या कमतरतेचा पूर्ण प्रांतातील रेस्टॉरंट्स आणि हॉटेल इंडस्ट्रीवर प्रभाव दिसून येतोय. महागाईमुळे देखील आम्हाल अधिक पैसे द्यावे लागत असून याचा थेट प्रभाव ग्राहकांवर पडत असल्याचे ऑस्ट्रेलियन हॉटेल्स असोसिएशनच्या वेस्ट ऑस्ट्रेलियन शाखेचे सीईओ ब्रॅडली वुड्स यांनी म्हटले आहे.

इंटरनॅशनल रेस्टॉरंट्सनाही फटका

चांगल्या आणि प्रसिद्ध रेस्टॉरंटसाठी उत्तम सेवा प्रदान करणाऱया लोकांची गरज आहे. अर्ज करणाऱयाला स्वयंपाकाचा अनुभव असावा. यशस्वी उमेदवाराला दर शुक्रवार आणि शनिवारसह आठवडय़ात सुमारे 40 तास काम करावे लागणार असल्याचे जफरानो रेस्टॉरंट चेनच्या जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.

Related Stories

बर्फाचे बुडबुडे अन् सर्वात खोल सरोवर

Patil_p

युक्रेन करणार संरक्षण मंत्र्याची हकालपट्टी

Patil_p

नेपाळमध्ये भीषण विमान अपघात; 44 प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू

Abhijeet Khandekar

रशियाकडून कोरोनाच्या दुसऱ्या लसीला मंजूरी

Tousif Mujawar

कोरोनामुक्त डोनाल्ड ट्रम्प यांचा आता प्रचारावर भर

Patil_p

गावातील प्रत्येक जण शुद्ध शाकाहारी

Patil_p