Tarun Bharat

ऑस्ट्रेलियातील मदतनिधी सामन्यात लारा खेळणार

वृत्तसंस्था/ सिडनी

ऑस्ट्रेलियात अलिकडेच झालेल्या भीषण वणवा दुर्घटनेत बळी पडलेल्यांची कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मदतनिधी सामना आयोजित केला आहे. या सामन्यात विविध देशांचे माजी क्रिकेटपटू सहभागी होत आहेत. भारताचा सचिन तेंडुलकर, विंडीजचा वॉल्श, ब्रायन लारा,  युवराजसिंग, पाकचा वासिम अक्रम, ऑस्टेलियाचे हेडन, सायमंडस्, हॅडिन, माईक हसी, गिल ख्रिस्ट, ब्रेट ली, लँगर, मायकेल क्लार्क, वॅटसन,  स्टिव्ह वाँ, ब्लॅकवेल, जोन्स सहभागी होणार आहेत.

सदर मदतनिधी सामना 8 फेब्रुवारी रोजी खेळविला जाणार आहे. या सामन्यातून जमा होणारा निधी वणवा दुर्घटनेतील बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना दिला जाणार असल्याची माहिती प्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने दिली आहे.

Related Stories

फॉर्ममधील मुंबईचा आज बांबोळीत ओडिशाशी सामना

Patil_p

अष्टपैलू मोईन अलीला ‘ओबीई’ बहुमान

Amit Kulkarni

झाग्रेब कुस्ती : अमन सेहरावतला कांस्यपदक

Amit Kulkarni

मध्य प्रदेशच्या डावात हिमांशू मंत्रीचे नाबाद शतक

Patil_p

मालिका आजच जिंकण्याचा भारताचा निर्धार

Patil_p

सित्सिपेस, बेन्सिक, अॅग्युट पराभूत

Patil_p