Tarun Bharat

ऑस्ट्रेलियातून दूध आयातीचा प्रस्ताव नाही

Advertisements

केंद्रीय मंत्र्यांचे स्पष्टीकरण : राकेशत टिकैतांचा आरोप फेटाळला

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

केंद्रीय मत्स्यपालन, पशूपालन आणि डेअरी मंत्री पुरुषोत्तम रुपाली यांनी मंगळवारी शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा ऑस्ट्रेलियातून दूध आयात करण्याचा प्रस्ताव असल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. टिकैत यांच्या आरोपांच्या प्रत्युत्तरादाखल ट्विट करत रुपाली यांनी काही संघटना केवळ विरोध आधारित राजकारणाच्या आधारावर काम करत असून चुकीची माहिती पसरवत असल्याचे म्हटले आहे.

काही संघटनांचा एकमात्र उद्देश शेतकऱयांचे लक्ष विचलित करणे आहे. पशूपालन आणि डेअरी विभागात दुग्धोत्पादनांच्या आयात शुल्कावर कुठल्याही प्रकारचा दिलासा देण्याचा कुठलाच प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे रुपाली म्हणाले.

ऑस्ट्रेलियासोबत दूध खरेदीसंबंधी सरकार पुढील महिन्यात करार करणार असून याच्या अंतर्गत 20-22 रुपये प्रतिलिटर दूध विकण्याची योजना आहे. विदेशातून दूध आयात करण्याच्या निर्णयामुळे देशातील पशूपालकांसमोर अस्तित्वाचे संकट निर्माण होणार असल्याचा दावा टिकैत यांनी दोन दिवसांपूर्वी ट्विटद्वारे केला होता.

टिकैत यांना प्रत्युत्तर

भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक आहे. आयात विसरा, आमच्याकडे दूधाचे भांडार असल्याने त्याची आयात करण्याची आम्हाला आवश्यकता नाही. याउलट आम्ही दूधाची कमतरता असलेल्या देशांना त्याची निर्यात करू शकतो, असे एका अधिकाऱयाने सांगितले आहे. सहकारी समित्यांना आर्थिक मदत करत दुधाची भुकटी तयार करून त्याचा संग्रह करण्यासाठी चालना सरकार देत असल्याचे अधिकाऱयाने म्हटले आहे. शासकीय आकडेवारीनुसार दुधाचे एकूण वार्षिक उत्पादन 198.40 टन (2019-20) इतके आहे. भारतात दरडोई दुधाची उपलब्धता 406 ग्रॅम आहे.

Related Stories

“लवकरच कोरोना संपणार;” विषाणूशास्त्रज्ञांचा दावा

Archana Banage

पीएम केअर्स फंडातून उभे राहणार 551 ऑक्सिजन प्रकल्प

datta jadhav

मध्यप्रदेशात 54 प्रवाशी असलेली बस कालव्यात कोसळली…

datta jadhav

लडाखमध्ये पूल कोसळून 4 मजूर ठार, 2 जखमी

Patil_p

विजापूर, बागलकोटमध्ये भूकंपाचे धक्के

Patil_p

कराडच्या जवानाला वीरमरण

Patil_p
error: Content is protected !!