Tarun Bharat

ऑस्ट्रेलियात महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

ऑस्ट्रेलियात भारताने भेट दिलेल्या महात्मा गांधींच्या कांस्य पुतळ्याची तोडफोड करण्यात आली आहे. शुक्रवारी संध्याकाळी 5.30 ते शनिवारी संध्याकाळी 5.30 दरम्यान अज्ञातांनी पॉवर टूल्सचा वापर करुन या पुतळ्याची तोडफोड केली. यात पुतळ्याचे काहीसे नुकसान झाले आहे. ही घटना अत्यंत दु:खद आणि संतापजनक असून आपल्याला याबाबत खेद असल्याचे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी म्हटले आहे.

भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात भारताचे दूत राजकुमार आणि ऑस्ट्रेलियांच्या नेत्यांसमवेत रावाविले येथील ऑस्ट्रेलियन इंडियन कम्युनिटी सेंटरमध्ये पंतप्रधान मॉरिसन यांनी या पुतळ्याचे अनावरण केले होते. त्यानंतर काही तासानंतर या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली.

मॉरिसन यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. अनादराची पातळी पाहणे लज्जास्पद आणि अत्यंत निराशाजनक आहे. सांस्कृतिक स्मारकांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत. नॉक्स क्राइम इन्व्हेस्टिगेशन युनिटचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांनी साक्षीदारांना पुढे येऊन माहिती देण्याचे आवाहन केले आहे. या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाने नाराजी व्यक्त केली आहे.

Related Stories

‘ब्रम्हपुत्रे’वर होणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या धरणास मंजुरी

datta jadhav

हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या ट्रायलला बंदी : WHO

datta jadhav

स्पेनला बसला चक्रीवादळासह पावसाचा जबर फटका

Patil_p

पाकिस्तानात हिंदू मुलीची हत्या

Patil_p

अमेरिका 4 अब्ज डॉलर्सचे साहाय्य करणार ?

Patil_p

कजाकस्तानात महागाईमुळे जनता संतप्त

Patil_p
error: Content is protected !!