Tarun Bharat

ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान कसोटी अनिर्णीत

कराची / वृत्तसंस्था

बाबर आझमने 196 धावांची असाधारण खेळी साकारल्यानंतर पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध येथील दुसरी कसोटी अनिर्णीत ठेवण्यात यश प्राप्त केले. विजयासाठी 506 धावांचे टार्गेट असताना पाकिस्तानने 171.4 षटकात 7 बाद 443 धावांसह ही लढत अनिर्णीत राखली. बाबरने 603 मिनिटे किल्ला लढवत 426 चेंडूत 21 चौकार व 1 षटकार फटकावला. रिझवानने 177 चेंडूत नाबाद 104 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियातर्फे नॅथन लियॉनने 112 धावात 4 बळी घेतले.

या बरोबरीसह दोन्ही संघांना प्रत्येकी 4 गुण मिळाले. पाकिस्तानने दिवसाच्या प्रारंभी 2 बाद 192 वरुन डावाला पुढे सुरुवात केली, त्यावेळी त्यांच्यासमोर 506 धावांचे लक्ष्य साध्य करणे किंवा पूर्ण 90 षटके खेळून काढणे, असे दोनच पर्याय होते. बाबर आझम, मोहम्मद रिझवान व अब्दुल्लाह शफीक यांच्या दमदार फलंदाजीमुळे 90 षटके खेळून काढणे त्यांना शक्य झाले. उभय संघातील तिसरी कसोटी 21 मार्चपासून लाहोरमध्ये खेळवली जाणार आहे.

Related Stories

पीएसजी चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत

Patil_p

विंडीज कसोटी संघाच्या कर्णधारपदी ब्रेथवेट

Patil_p

पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलियाची आघाडी

Patil_p

ट्रेंट बोल्टचा मोर्चा आता राष्ट्रीय संघाकडे

Omkar B

झुंजार खेळ करूनही भारतीय महिला पराभूत

Patil_p

यजमान इंग्लंडची पाकिस्तानवर 5 गडय़ांनी मात

Patil_p