Tarun Bharat

ऑस्ट्रेलिया-लंका टी-20 मालिका आजपासून

Advertisements

सिडनी  ः यजमान ऑस्ट्रेलिया आणि लंका यांच्यात येथे पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज शुक्रवारी सिडनी क्रिकेट मैदानावर खेळविला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघामध्ये जोश इंग्लिसचे पदार्पण होणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व फिंचकडे सोपविण्यात आले आहे. या संघात मिचेल मार्शच्या जागी जोश इंग्लिसचा समावेश करण्यात आला आहे. फलंदाजीत आता मॅकडरमॉटसमवेत सलामीला इंग्लिसला पाठविले जाणार आहे. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियन संघात डेव्हिड वॉर्नरच्या जागी मॅकडरमॉटचा समावेश करण्यात आला आहे. लंकेविरूद्ध होणाऱया या मालिकेसाठी मार्श आणि वॉर्नर यांना विश्रांती देण्यात आली आहे.या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी हेड उपलब्ध राहणार नाही. ऑस्ट्रेलिया टी-20 संघ- मॅकडरमॉट, फिंच (कर्णधार), इंग्लीस, स्टीव्ह स्मिथ, मॅक्सवेल, स्टोनीस, वेड, पॅट कमिन्स, स्टार्क, झंपा आणि हॅजलवूड.

Related Stories

खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

Patil_p

मुष्टियोद्धी सरिता देवीला कोरोनाची लागण

Patil_p

कोलकाता नाईट रायडर्सचा दणदणीत विजय

Patil_p

रोहित शर्मा शेवटच्या दोन कसोटीत खेळणार

Patil_p

विंडीजची ऑस्ट्रेलियावर मालिकेत विजयी आघाडी

Patil_p

भारत फिनलँडकडून 1-3 ने पराभूत

Patil_p
error: Content is protected !!