Tarun Bharat

ऑस्ट्रेलिया संघ बांगलादेश दौऱयावर जाण्याची शक्यता

Advertisements

वृत्तसंस्था/ मेलबर्न

यावर्षी भारतात टी-20 विश्वचषक स्पर्धा होत असल्याने त्याच्या तयारीचा एक भाग म्हणून ऑस्ट्रेलिया संघ टी-20 मालिका खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा करण्याची शक्यता आहे. हा दौरा नियोजनाप्रमाणे झाला तर 2017 नंतर त्यांचा हा बांगलादेशचा पहिलाच दौरा असेल.

याआधी विश्व कसोटी चॅम्पियनशिपचा एक भाग म्हणून ऑस्ट्रेलियाचा संघ बांगलादेश दौऱयावर कसोटी मालिका खेळण्यासाठी जाणार होता. पण या नियोजनात आता बदल करण्यात आला असल्याचे वृत्त एका क्रीडा वेबसाईटने दिले आहे. एफटीपीच्या कार्यक्रमानुसार, टी-20 विश्वचषकाआधी इंग्लंड संघ बांगलादेशचा दौरा करणार आहे. त्यामुळे इंग्लंड, बांगलादेश व ऑस्ट्रेलिया या तीन संघांत तिरंगी मालिका खेळविली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या छोटय़ा दौऱयासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया व बीसीबी यांच्यात बोलणी सुरू आहेत. अलीकडेच ऑस्ट्रेलियाने कोरोना महामारीच्या कारणास्तव द.आफ्रिका दौरा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलिया संघ आता न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिका खेळताना दिसणार आहे.

Related Stories

आयसीसीने 10 वर्षात क्रिकेट ‘संपवले’ : शोएब अख्तर

Patil_p

अपराजित इंग्लंड- ऑस्ट्रेलिया आज आमनेसामने

Patil_p

विंडीजला 32 वर्षांनंतर मालिकाविजयाची संधी

Patil_p

महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी इंडोनेशिया पात्र

Amit Kulkarni

फजल खलील केएससीए निवड समितीचे अध्यक्ष

Patil_p

नदाल, सित्सिपस, प्लिस्कोव्हा, कॅनेपी तिसऱया फेरीत

Amit Kulkarni
error: Content is protected !!