Tarun Bharat

ओआरएसची संजीवनी

Advertisements

जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार जगात पाच वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुलांचा मृत्यू होण्यामागच्या अनेक कारणांपैकी अतिसार हे एक महत्त्वाचे कारण आहे. अस्वच्छतेमुळे होणारा अतिसार हा काहीवेळा जीवघेणा ठरू शकतो. अतिसारामुळे शरिरातील इलेक्ट्रोलाइटस निघून जातात आणि डिहायड्रेशन होते. डिहाड्रेशनपासून बचाव करण्यासाठी ओआरएसचे मिश्रण पिण्याचा सल्ला दिला जातो. ओरआरएसचे महत्त्व जगभरात अधोरेखित व्हावे यासाठी 29 जुलै हा जागतिक ‘ओआरएस-डे’ म्हणून साजरा केला जातो. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, ओरआरएसमध्ये चार महत्त्वाचे घटक असतात. हे घटक एक लिटर स्वच्छ पाण्यात मिसळण्याची गरज आहे. ते घटक म्हणजे

 • सोडियम क्लोराइड (मीठ) : 3.5 ग्रम
 • ट्रायसोडियम सायट्रेट, डिहायड्रेट : 2.9 ग्रम
 • पोटॅशियम क्लोराइड :1.5 ग्रम
 • ग्लुकोज (साखर) : 20 ग्रम

अतिसारानंतर ओआरएसचे प्रमाण किती हवे?

 • जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत काही सूचना दिल्या आहेत.दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळास प्रत्येक जुलाबानंतर 50 ते 100 मिली किंवा पाव ते अर्धा कप ओआरएसचा डोस द्यावा.
 • 2 ते 9 वयोगटातील  मुलांना 100 ते 200 मिली (अर्धा कप किंवा एक कप)
 • दहा वर्षापेक्षा अधिक वयोगटातील मुलास दिवसभरात दोन लिटर म्हणजेच 8 कप ओआरएसचे मिश्रण द्यावे.
 • जॉन्सन हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिकच्या एका संशोधनामध्ये ओआरएसच्या सेवनातून 93 टक्क्यांपर्यंत अतिसारामुळे होणारे मृत्यू रोखता येऊ शकतात, असे म्हटले आहे.
 • ओरल रिहायइड्रेशन सॉल्ट म्हणजेच ओआरएस होय. त्याच्या सेवनातून शरिरात कमी झालेले इलेक्ट्रोलाइटस परत मिळवण्यासाठी मदत मिळते.
 • वास्तविक ओआरएसचे मिश्रण बाजारात, मेडिकलमध्ये सहजपणे मिळते. परंतु आपण घरातही सहजपणे तयार करू शकता.

अतिसारमध्ये कशी मदत होते?

 • अतिसाराच्या काळात उलटी आणि जुलाब होत असल्यामुळे शरिरातील सर्व मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइट बाहेर निघून जातात. परिणामी डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ लागते. अतिसारामुळे डिहायड्रेशनच्या गंभीर समस्येच्या उपचारासाठी रुग्णाला घरातच अतिरिक्त पातळ पदार्थ दिले जातात किंवा संबंधित व्यक्तीला ग्लूकोज-इलेक्ट्रोलाइट सोल्यूशन दिले जाते. यास आपण ओरल रिहायड्रेशन सॉल्ट म्हणजेच ओआरएसचे मिश्रण असे म्हणू शकतो. हे शरिरात नव्याने मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइटस तयार करण्यास मदत करतात.
 • घरात ओआरएस तयार करण्यासाठी एक लिटर पाण्यात 30 ग्रम साखर आणि अर्धा चमचा मीठ घ्यावे. दोघांचे पाण्यात चांगले मिश्रण तयार करा आणि त्याचे प्राशन करा.

मुलांना ओआरएस किती द्यावे?

 • अतिसाराने पीडित मुलगा असो किंवा वयस्कर असो, अधिकाधिक ओआरएसचे  प्राशन करण्याचा सल्ला दिला जातो. दोन वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुलांना अतिसार झाल्यास 250 मिलीमीटर किंवा अर्धा कप एवढे ओआरएसचे मिश्रण दिले जाते. लक्षात ठेवा, बाळाला शौच झाल्यास ओआरएसचा आणखी एक डोस निश्चित द्यावा.

ओआरएस तयार करून ठेवावे का?

 • ओआरएसचे मिश्रण हे चोवीस तासापर्यंत चांगले राहू शकते. त्यापेक्षा अधिक काळ ठेवू नये. 

ओआरएस तयार करताना…

 • ओआरएसचे मिश्रण प्राशन केल्यानंतर बाळाला उलटी येत असेल तर थोडय़ा वेळाने पुन्हा ओरआरएसची मात्रा द्यावी.
 • प्रत्येक दोन तासाला नवीन मिश्रण तयार केल्यास फायद्याचे राहिल. पाकिटावरच्या सूचनांचेही पालन करावे.
 • ओआरएस तयार करताना स्वच्छतेची काळजी घ्यावी. विशेषतः भांडे आणि बाटली तसेच ग्लास स्वच्छ असावेत.
 • ओआरएस तयार करण्यापूर्वी हात स्वच्छ करा. साबणाने धुवा.
 • ओआरएसचे मिश्रण घट्ट करू नये. कारण ओरआरएसमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असणे गरजेचे आहे.
 • ओआरएसचे मिश्रण हे केवळ पाण्यापासून तयार करावे. त्यास दूध, सूप, ज्यूस किंवा सॉफ्ट ड्रिक्सबरोबर प्राशन करू नये.

– डॉ. महेश बरामदे

Related Stories

जाणून घ्या बीट आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे

Abhijeet Khandekar

पृष्ठ मुद्रा

Omkar B

पावसाळ्यात नळाला गढूळ पाणी आल्यास ‘असे’ करा घरगुती उपाय?

Abhijeet Shinde

आज जागतिक अल्झायमर्स डे … डिमेंशियाबद्दल बोलूया

GAURESH SATTARKAR

अंडी खा पण

Amit Kulkarni

कोरोना आणि भाजीपाला

Omkar B
error: Content is protected !!