Tarun Bharat

ओएमआरद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षेची माहिती

दहावी परीक्षेसाठी प्रथमच बहुपर्यायी प्रश्न

बेळगाव / प्रतिनिधी

कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेली दहावीची परीक्षा दि. 19 व 22 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. यावषी प्रथमच विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्न समाविष्ट असणारी प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे. मॉडेल ओएमआर पत्रिकेद्वारे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये बोलावून माहिती देण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडविणे व उत्तरपत्रिका भरणे सोयीचे ठरणार आहे.

यावर्षी कोरोनामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईनच वर्ग भरले. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून बहुपर्यायी प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. प्रश्नाच्या अचूक उत्तराचा पर्याय पाहून उत्तरपत्रिकेतील भरावा लागणार आहे. तो अर्धवट किंवा बाहेर भरून चालणार नसल्याची माहिती शिक्षकांकडून दिली जात आहे. मॉडेल ओएमआरच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेबाबत माहिती दिली जात आहे.

ऑनलाईन माहिती देणे कठीण

दहावीच्या विद्यार्थ्यांना ओएमआर उत्तरपत्रिकेबाबत ऑनलाईन माहिती द्या, अशा सूचना दिल्या होत्या. परंतु ऑनलाईन माहिती दिल्यानंतर त्याबद्दल विद्यार्थ्यांना समजणे कठीण जात असल्याने काही शाळा विद्यार्थ्यांना शाळांमध्ये बोलावून ओएमआर उत्तरपत्रिकेबाबतची माहिती दिली आहे.

मॉडेल उत्तरपत्रिका वेबसाईटवर उपलब्ध

विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची माहिती व्हावी व त्यांच्या मनातील भीती कमी व्हावी, या उद्देशाने मॉडेल ओएमआर उत्तरपत्रिका शिक्षण विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. sslc.karnataka.gov.in  या संकेतस्थळावर मॉडेल प्रश्नपत्रिका उपलब्ध आहे. तसेच इतर माहितीदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Related Stories

फॅन्सी नंबर प्लेट ; दुचाकीस्वारांवर कारवाई

Amit Kulkarni

पायीदिंडीसाठी खानापुरातील वारकरी रवाना

Amit Kulkarni

माविनकट्टी येथील पडलेल्या घरांना नुकसानभरपाई द्या

Amit Kulkarni

आळवंत स्पोर्ट्स क्लब तुरमुरीतील स्पर्धेत विजेते

Amit Kulkarni

मध्यवर्ती बसस्थानकासमोर कचऱ्याचे ढिगारे

Amit Kulkarni

मलिकवाड येथे पथनाटय़ातून जनजागृती

Patil_p