Tarun Bharat

ओकांब धारबांदोडा येथे बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

प्रतिनिधी/ फोंडा

ओकांब-धारबांदोडा येथे दुधसागर नदीच्या पात्रात बुडालेल्या युवकाचा मृतदेह काल रविवारी सकाळी 10.30 वा. सुमारास नदीत तरंगताना आढळला. नातेवाईकांकडून त्याची ओळख कृष्णा विष्णू भंडारी (28, तिस्क-उसगांव मूळ कर्नाटक) अशी पटली आहे. सदर प्रकार शुक्रवार सायंकाळच्या सुमारास उघडकीस आला होता.

फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 ऑक्टोबर रोजी तिस्क उसगांव येथे भाडय़ाच्या खोलीत राहत असलेला कृष्णा आपल्या एमआरएफ कंपनीतील सात मित्रासह संजीवनी साखर कारखान्याच्या पाठीमागे असलेल्या ओकांब धारबांदोडा येथील नदीच्या पात्रात आंघोळीसाठी गेला होता. आपल्या मित्राच्या नजरेसमोर नदीत पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून बेपत्ता झाला होता. अग्निशामक दलाने शुक्रवारी व शनिवारी शोध मोहिम हाती घेऊन शोधकार्य केले होते. काल रविवारी परत एकदा शोध मोहीम हाती घेण्यात आली असता घटनास्थळावरून काही अंतरावर त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला. त्यानंतर अग्निशामक दलाने मृतदेह फोंडा पोलिसांच्या स्वाधीन केला. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. त्याच्या पार्थिवावर मूळ गावी हल्ल्यार  कर्नाटक येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याप्रकरणी उपनिरीक्षक नारायण पिंगे अधिक तपास करीत आहे.

Related Stories

गोवा बेळगाव चोरला महामार्गावर दुरूस्ती

Patil_p

गोव्याच्या नितीश बेलुरकरने दोन ग्रँडमास्टर्सना केले पराभूत

Amit Kulkarni

गोमंतक बहुजन महासंघाचे उपेंद्र गावकर कार्यकारी अध्यक्ष

Amit Kulkarni

सुधीर, सुखविंदरनेच काढला सोनालीचा काटा

Amit Kulkarni

जायकाकडून दोन हजार कोटींचे कर्ज घेणार

Amit Kulkarni

विनापरवाना बंदूक वापरल्याप्रकरणी काणकोणात दोघांना अटक

Omkar B