Tarun Bharat

ओझोनचा थर येतोय पूर्वपदावर; संशोधकांचा दावा

Advertisements

ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :


    कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील 50 हून अधिक देशांनी लॉकडाऊन केल्याचा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसणार असला तरी पर्यावरणावर मात्र, याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. आताच्या ताज्या संशोधनात ओझोनचा थर बर्‍याच अंशी पूर्वपदावर येत असल्याचा दावा युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडो बोल्डरमधील संशोधकांनी केला आहे.

 आतापर्यंतच्या प्रदूषणाने पृथ्वीभोवती असलेल्या ओझोनच्या थराचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, जगभरातील 50 हून अधिक देशांनी लॉकडाऊन केल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच वाहने, उद्योगधंदे, कारखाने बंद असल्याने पर्यावरणाच्या गुणवत्तेतही सुधारणा होत आहे. ओझोनचा थर बर्‍याच अंशी पूर्वपदावर येत आहे. 

सूर्यापासून निघणारी घातक किरणे शोषणार्‍या ओझोनच्या थराला छिद्रही पडल्याचे समोर आले होते.मात्र, आता हे छिद्रही आपोआप भरले जात असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.लॉकडाऊनमुळे चीनच्या बाजूने होणारे प्रदूषण आता ओझोनच्या दिशेला जात नाही. त्यामुळे पृथ्वीच्या दक्षिण भागात असणार्‍या अंटार्टिका भागावर असणार्‍या ओझोनच्या थरावरील छिद्र भरत आहेत. हा बदल थोड्या काळासाठी असला तरी तो सकारात्मक आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

Related Stories

भारतीय वंशाच्या डॉक्टरांचा पुढाकार

Patil_p

वाघापुरात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या प्रतिमेचे दहन

Sumit Tambekar

महाराष्ट्रात 2701 नवे कोरोना रुग्ण ; 1802 रुग्ण कोरोनामुक्त

Rohan_P

…अन् तुम्हाला लाजा वाटत नाहीत

datta jadhav

कर्नाटक लॉकडाऊन : किराणा दुकानं दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू राहणार

Abhijeet Shinde

युद्ध सुरू झाल्यास अमेरिका धावून येणार : तैवान

Amit Kulkarni
error: Content is protected !!