Tarun Bharat

ओटीटीवर क्रिती सेनन करणार पदार्पपण

लवकरच सुरू होणार चित्रिकरण

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन स्वतःच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. याचमुळे तिच्याकडे अनेक चित्रपटांच्य ऑफर्स आहेत. क्रितीने आता ओटीटीवर पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रितीने जी5 ची आगामी वेबसीरिज ‘रक्तपथ’मध्ये काम करण्यास होकार दिल्याचे वृत्त आहे. या वेबसीरिजमध्ये क्रिती मुख्य भूमिका साकारणार आहे.

रक्तपथचे दिग्दर्शन आर.के. रेड्डी करणार असून याची निर्मिती नरेश जैन करणार आहेत. या वेबसीरिजमध्ये क्रितीबरोबरच अभिनेता प्रतीक बब्बर दिसून येणार आहे. प्रतीकने विविध वेबसीरिजमध्ये काम करून स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली आहे. क्रितीने अलिकडेच अरुणाचल प्रदेशात वरुण धवनसोबत ‘भेडिया’ या चित्रपटाचे चित्रिकरण संपविले आहे. राजकुमार रावसोबत ‘क्विर्की कॉमेडी’मध्ये ती दिसून येणार आहे. बच्चन पांडेचे चित्रिकरण तिने संपविले असून यात ती अक्षय कुमारची नायिका आहे. याचबरोबर सुपरस्टार प्रभास आणि सैफ अली खानचा चित्रपट ‘आदिपुरुष’मध्ये क्रिती झळकणार आहे.

Related Stories

सागर घेतोय ऑनलाईन गिटारचे धडे

Patil_p

मालिकांनी केलं सीमोल्लंघन

Patil_p

जान्हवीचा चित्रपट येणार ओटीटीवर

Patil_p

मिस इंडिया अंतिम स्पर्धेसाठी सोलापूरच्या ईशा वैद्यची निवड

Archana Banage

‘आदिपुरुष’च्या चित्रिकरणास मुंबईत प्रारंभ

Patil_p

दिया मिर्झा सोमवारी पुन्हा विवाहबंधनात

Patil_p