Tarun Bharat

ओडिशामधील व्यापाऱ्याने बनवला 3.5 लाख रुपयांचा ‘सोन्याचा मास्क’

Advertisements

ऑनलाईन टीम / कटक : 


कोरोना व्हायरसपासून बचाव व्हावा यासाठी लोकांना मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे बाजारात आता वेगवेगळ्या प्रकारचे मास्क उपलब्ध झाले आहेत. त्यातच आता ओडिशामधील एका व्यापाऱ्याने चक्क 3.5 लाख रुपयांचा ‘सोन्याचा मास्क’ बनवून घेतला आहे. 


कटकमध्ये राहणाऱ्या या व्यापाऱ्याने सांगितले की, मी 3.5 लाख रुपयांचा मास्क स्वतः साठी बनवून घेतला आहे. पुढे तो म्हणाला, मला सोने खूप आवडते. त्यामुळे लोक मला गोल्डमॅन म्हणतात आणि गेल्या 40 वर्षांपासून मी सोने वापरत आहे. 


पुढे तो म्हणाला, मी हा मास्क पुण्यातील एका व्यक्तीमुळे प्रभावित होऊन बनवला आहे. मी ऐकले होते की पुण्यातील एका व्यक्तीने सोन्याचा मास्क बनवला आहे. त्यानंतर मी देखील स्वतः साठी सोन्याचा मास्क बनवण्याचा निर्णय घेतला. 


दरम्यान, याआधी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड मध्ये राहणारे शंकर कुराड यांनी स्वतः साठी 2.89 लाख रुपयांचा सोन्याचा मास्क बनवला होता. 

Related Stories

‘..म्हणून भाजपाला मंदिरांचे राजकारण करायचे आहे’

Abhijeet Shinde

अंगणवाडी सेविकांना ठाकरे सरकारकडून खास भाऊबीज भेट!

Rohan_P

विसापूर येथे शेततळ्यात पाय घसरून महिलेचा मृत्यू

Sumit Tambekar

अमेरिकेत 24 तासात 2228 कोरोना बळी

prashant_c

आदिवासी महिला प्रथमच राष्ट्रपतिपदी

Amit Kulkarni

धुळे शहरात राजर्षी शाहू महाराजांचे स्मारक

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!