Tarun Bharat

ओडिशा विधानसभेत भाजप आमदाराचा सॅनिटायझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

ऑनलाईन टीम / भुवनेश्वर : 

ओडिशा विधानसभेत भाजपाच्या एका आमदाराने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने विधानसभेत एकच खळबळ उडाली. सुभाषचंद्र पाणिग्रही असे या आमदाराचे नाव असून, ते देवगड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी अन्न, पुरवठा आणि ग्राहक कल्याण मंत्री रणेंद्र प्रताप स्वैन हे विधानसभेत धान्य खरेदीवर विचारलेल्या प्रश्‍नावर उत्तर देत होते. यावेळी राज्यातील तांदुळ खरेदीच्या मुद्यावर आक्रमक होताना पाणिग्रही यांनी टोकाची भूमिका घेत सॅनिटायझर पिण्याचा प्रयत्न केला. संसदीय कामकाज मंत्री बिक्रम केशरी अरुखा आणि इतर आमदारांनी त्यांना रोखत त्यांच्या हातातील सॅनिटायझर हिसकावून घेतले. पाणिग्रही यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती ठिक असल्याचे सांगण्यात येते.

पाणिग्रही यांनी सरकारवर आरोप केला आहे की, राज्यातील शेतकरी तांदुळ खरेदीबाबत कायमच चिंताग्रस्त आहे. मात्र, सरकार त्याकडे लक्ष देत नाही. सरकार टोकन सिस्टिम आणि बाजार समित्यांमधील चुकीच्या व्यवस्थापनासारखे प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरले आहे.

Related Stories

कोरोनाचा नवा XE व्हेरियंट Omicron पेक्षा धोकादायक – WHO

Archana Banage

राज्यसभेत राजा विरुद्ध महाराजा

Patil_p

Assembly Speaker Election Live Update : शिंदे गटाचा शिवसेनेला धक्का,राहुल नार्वेकर बहुमतांनी विजयी

Abhijeet Khandekar

आमदार थांबलेल्या रिसॉर्ट विरोधात एफआयआर

Patil_p

…तर रुग्णांचा आकडा दिवसाला 24 हजार पर्यंत जाईल – पालकमंत्री

Abhijeet Khandekar

कोडोलीत संभाजी महाराजांच्या मिरवणूकी दरम्यान राडा

Abhijeet Khandekar