Tarun Bharat

ओपेल्काचा मेदवेदेवला धक्का, शॅपोव्हॅलोव्हची आगेकूच

Advertisements

वृत्तसंस्था/ सेंट पीटर्सबर्ग

अमेरिकेच्या रेली ओपेल्काने निर्णायक सेटमध्ये चार ब्रेक पॉईंट्स वाचवत विद्यमान विजेत्या डॅनील मेदवेदेवचा 6-2, 7-5, 6-4 असा पराभव करून सेंट पीटर्सबर्ग ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.

जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असणाऱया मेदवेदेवला येथे अग्रमानांकन मिळाले होते. ओपेल्काची पुढील लढत सातव्या मानांकित बोर्ना कोरिकशी होईल. कोरिकने रशियाच्या रोमन सुफिउलिनचा 6-3, 7-5 असा पराभव केला. अन्य सामन्यात द्वितीय मानांकित कॅनडाच्या डेनिस शॅपोव्हॅलोव्हने बेलारुसच्या इलिया इवाश्काचा 6-1, 6-4 असा पराभव करीत आगेकूच केली. त्याची लढत स्वित्झर्लंडच्या स्टॅन वावरिंकाशी होणार आहे.

आंद्रेय रुबलेव्हने एका सेटची पिछाडी भरून काढत युगो हम्बर्टवर 4-6, 6-4, 7-5 अशी मात केली. ब्रिटच्या कॅमेरॉन नॉरीशी त्याची उपांत्यपूर्व लढत होईल. रुबलेव्हने गेल्या 12 सामन्यात 11 विजय मिळविले आहेत, त्यात हॅम्बुर्ग ओपन जेतेपद आणि पेंच ओपन उपांत्यपूर्व फेरीपर्यंतच्या सामन्यांचाही समावेश आहे. या या कामगिरीमुळे त्याला एटीपी क्रमवारीत पहिल्यांदाच टॉप टेनमध्ये स्थान मिळविता आले आहे. अन्य एका लढतीत रशियाच्या कॅरेन खचानोव्हने आपल्याच देशाच्या अस्लन कारात्सेव्हवर 4-6, 7-5, 6-3 अशी मात केली तर कॅनडाच्या मिलोस रेऑनिकने अलेक्झांडर बुबलिकचा 6-3, 6-2 असा पराभव केला.

Related Stories

इचलकरंजी संघाकडे एसीए चषक

Patil_p

हुकूमत पंजाबची, विजय मात्र राजस्थानचा!

Patil_p

सचिन तेंडुलकरचे 1 कोटी रुपयांचे सहाय्य

Amit Kulkarni

सप्टेंबरमध्ये भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱयावर

Patil_p

टोरेसचा मँचेस्टर सिटीबरोबर पाच वर्षांचा करार

Patil_p

हिरो इंडियन खुली गोल्फ स्पर्धा रद्द

Patil_p
error: Content is protected !!