Tarun Bharat

ओबीसींचं राजकीय आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत निवडणुका नको: देवेंद्र फडणवीस

मुंबई/प्रतिनिधी

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय बैठकीचे पुन्हा आयोजन करण्यात आले होते. आरक्षण लागू होईपर्यंत आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर टाकाव्यात या सर्वपक्षीय नेत्यांच्या मागणीनुसार काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, ओबीसी आरक्षणा संदर्भात सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ”ओबीसी राजकीय आरक्षणाच्या संदर्भात, आज पुन्हा एकदा बैठक झाली आणि बैठकीत तत्काळ हे आरक्षण लागू झालं पाहिजे आणि जोपर्यंत आरक्षण लागू होत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत. अशी मागणी पुन्हा एकदा आम्ही मांडलेली आहे.” असं त्यांनी सांगितले.

Related Stories

#NashikOxygenLeak : बेपर्वाई झाली असेल तर सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं-राज ठाकरे

Archana Banage

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान बरखास्तीच्या हालचाली

Archana Banage

२०३० पर्यंत रेबीज रोगाचे समूळ उच्चाटन शक्य – डॉ. ढोके

Archana Banage

‘या’ ग्रामपंचायतीला मिळाला शिंदे गटाचा पहिला सरपंच

datta jadhav

किणी टोल नाक्यावर जिल्हा प्रशासनाच्या टोकनसाठी तोबा गर्दी; प्रवाशांची मोठी गैरसोय

Archana Banage

लॉकडाऊन उठवण्याचा प्रश्नच येत नाही; राजेश टोपेंनी स्पष्ट केली भूमिका

Archana Banage
error: Content is protected !!