Tarun Bharat

ओबीसी आरक्षणासाठी गडहिंग्लजला जनता दलाची निदर्शने

Advertisements

प्रतिनिधी/गडहिंग्लज

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला स्थगितीचा निर्णय दिला आहे. 27 टक्के जागा वगळून उर्वरीत 73 टक्के जागेवर आयोगाकडून निवडणूका घेण्याचा निर्णय घेतल्याने ओबीसीवर समाजावर अन्याय होत आहे. याच्याविरोधात जनतादलाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळय़ासमोर गुरूवारी सकाळी निदर्शने करत सर्वच निवडणूका रद्द करण्याची मागणी केली. जनतादलाचे नेते ऍड. श्रीपतराव शिंदे, नगराध्यक्षा स्वाती कोरी, तालुकाध्यक्ष बाळेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षण संपुष्टात येईल. ओबीसी समाजाला पुर्वीप्रमाणे आरक्षण मिळेपर्यंत राज्यातील नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हापरिषद, ग्रामपंचायतीत निवडणूका घेवू नयेत अन्यथा मोठा उद्रेक होण्याची भिती व्यक्त केली आहे. या आंदेलनात उपनगराध्यक्ष महेश कोरी, नगरसेवक बसवराज खणगावे, नितीन देसाई, उदय कदम, नाझ खलिफा, सुनिता पाटील, विणा कापसे, बाळकृष्ण परीट, सागर पाटील, शशीकांत चोथे, सरपंच सतिश कोळेकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.

Related Stories

गर्भवतींनाही लवकरच कोरोनाची लस

Archana Banage

कागल पोलिस स्थानकात दोघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल

Archana Banage

“ठाकरे-पवार हिंमत असेल तर मला अडवून दाखवा”

Archana Banage

लग्नाचा नवा फंडा; 80 हजार घेऊन मंडपातून तरुणी पसार

Archana Banage

डोळ्यांच्या रूग्णांत वाढ, स्ट्रेनचा धोका !

Archana Banage

कोरोची येथील युवकाचा निर्घृण खून

Archana Banage
error: Content is protected !!