Tarun Bharat

ओमायक्रॉन झाला तरीही ठणठणीत; लसींची कमाल

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

सिंगापूरमध्ये दोघांना कोरोनाची लागण झाली होती. चाचणीनंतर तो ओमायक्रॉन असल्याची पुष्टी झाली. तरीही त्यांची प्रकृती ठणठणीत होती. ही होती त्यांनी घेतलेल्या लसींची कमाल. त्यामुळे ओमायक्रॉन हा स्प्रेडर असला तरी घातक नसल्याचे पुन्हा एकदा जगासमोर आले असून, नागरिकांचा जीव भांडय़ात पडला आहे.

6 डिसेंबरला जर्मनीहून सिंगापूरला आलेल्या एका प्रवाशामध्ये कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळून आला होता. तसेच विमानतळावर तपासणी करताना कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या 24 वर्षीय तरुणीमध्येही ओमायक्रॉनची पुष्टी झाली. या दोन्ही रुग्णांची प्रकृती सध्या ठणठणीत आहे. त्यामुळे ओमायक्रॉन हा स्प्रेडर असणारा व्हेरिएंट घातक नसल्याचे दिसून आले. दरम्यान, या दोन्ही रुग्णांनी कोरोनाचा बुस्टर डोस घेतल्याचे समजते. सध्या सिंगापूरमध्ये 87 टक्के नागरिकांचे पूर्ण लसीकरण झाले असून, 29 टक्के लोकांनी लसीचा बूस्टर डोसही घेतला आहे.

पुण्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्ण दहाव्या दिवशी निगेटिव्ह

29 नोव्हेंबरला पुण्यातील एका व्यक्तीची ओमायक्रॉन टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. 18 ते 25 नोव्हेंबर या काळात ही व्यक्ती फिनलँड येथे गेली होती. व त्यानंतर पुण्यात परतली. या व्यक्तीला कोणतीही लक्षणं नसल्यामुळे ती संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये होती. 10 दिवसानंतर त्यांची पुन्हा कोरोना टेस्ट करण्यात आली त्यावेळी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, खबरदारी म्हणून पुढील 7 दिवस त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.

Related Stories

कोरोनाचा कहर : भारतात चोवीस तासात 7466 नवे रुग्ण, 175 मृत्यू

Tousif Mujawar

चीनमध्ये तब्बल 35 कोटी सीसीटीव्ही

datta jadhav

केरळ मतदार यादीप्रकरणी होणार चौकशी

Patil_p

‘बंडखोर आमदारांना बंगालला पाठवा, आम्ही त्यांचा चांगलाच..!’

Archana Banage

लोकसभेच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा

prashant_c

ट्रम्प यांच्या विदेश धोरणाला आणखी एक यश

Patil_p